Cocktail-2 First song Jab Talak out  pudhari photo
मनोरंजन

Cocktail-2 First song Jab Talak | फ्रेंडशीप, लव्ह अन् टोटल मॅडनेस! कॉकटेल २ मधून शाहिद-क्रिती-रश्मिकाचा धमाल डान्स, पाहा व्हिडिओ

समुद्रकिनारा, पार्टी आणि जबरदस्त डान्स! 'कॉकटेल २' मधील शाहिद-क्रिती-रश्मिकाचा 'धमाल' अंदाज; पाहा व्हायरल व्हिडिओ

स्वालिया न. शिकलगार

२०१२ मध्ये आलेल्या 'कॉकटेल'च्या प्रचंड यशानंतर आता त्याचा सीक्वल 'कॉकटेल २' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज या चित्रपटातील 'जब तलक' हे पहिले गाणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले. या गाण्यात शाहिद कपूर (कुणाल), रश्मिका मंदाना (दिया) आणि क्रिती सेनॉन (ॲली) ही जोडी समुद्रकिनारी धम्माल करताना दिसत आहे. अरिजित सिंग आणि आकासा सिंग यांनी गायलेले हे गाणे संगीतकार प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे.

COCKTAIL 2 Shahid Kapoor, Rashmika Mandanna, Kriti Sanon song Jab Talak out

बॉलिवूडमध्ये सध्या सीक्वलचा ट्रेंड जोरात आहे. 'मॅडॉक फिल्म्स'ने आपल्या सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असलेल्या 'कॉकटेल'च्या सीक्वलची घोषणा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 'कॉकटेल २' (Cocktail 2) या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती, आणि आज ८ एप्रिल रोजी या चित्रपटातील पहिले गाणे 'जब तलक' रिलीज झाले आहे. जे मैत्रीच्या नव्या प्रवासाचा अनुभव घेऊन आला आहे.

मैत्री आणि प्रेमाचा नवा प्रवास

या गाण्यात शाहिद कपूर, क्रिती सेनॉन आणि रश्मिका मंदाना यांची फ्रेश केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. मूळ 'कॉकटेल'मधील 'तुम ही हो बंधू' या गाण्याची आठवण करून देणारे हे गाणे एका बीच पार्टीच्या पार्श्वभूमीवर चित्रित करण्यात आले आहे. नेटकऱ्यांनी तुम ही बो बंधू गाण्याची त्रिकुट (डायना-सैफ-दीपिक) यांचा फोटो आणि कॉकटेल २ मधील शाहिद-रश्मिका-क्रिती यांचा फोटो लावून तुलन केलीय. सोशल मीडियावर याचा सध्या ट्रेंड पाहायला मिळत आहे.

शाहिद कपूरचा स्टायलिश लूक, क्रिती सेनॉनचा ग्लॅमरस अवतार आणि रश्मिका मंदानाचा बबली स्वभावामुळे हे गाणे लक्षवेधी ठरले आहे.

पात्रांची नावे आली समोर

या गाण्यासोबतच निर्मात्यांनी मुख्य पात्रांच्या नावांचाही खुलासा केला आहे. चित्रपटात शाहिद कपूर 'कुणाल' च्या भूमिकेत आहे, रश्मिका मंदाना 'दिया' तर क्रिती सेनॉन 'ॲली' च्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेमातला त्रिकोण या त्रिकुटांच्या मैत्री प्रवासात दिसणार आहे.

या गाण्याला अरिजीत सिंहने आवाज दिलाय. संगीत प्रीतम चक्रवर्तीने दिलं आहे. बोल अमिताभ भट्टाचार्यांनी लिहिलं आहे. गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यूट्यूबवर काही तासातच २ लाख ४८ हजारहून अधिक व्हयूज मिळाले आहेत.

कधी रिलीज होणार 'कॉकटेल २'?

हा चित्रपट १९ जून, २०२६ रोजी रिलीज होणार आहे. दिग्दर्शक होमी अदजानिया यांनीच मूळ 'कॉकटेल'चेही दिग्दर्शन केले होते. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' नंतर पुन्हा एकदा एकत्र दिसत आहेत, तर रश्मिका मंदाना या दोघांसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहे. 'पुष्पा' नंतर रश्मिकाचा हा बॉलिवूडमधील मोठा प्रोजेक्ट मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT