हे दोन शो मराठीतून पाहता येणार  instagram
मनोरंजन

C.I.D-Aahat tv show | ‘सीआयडी आणि 'आहट' मराठीतून पाहता येणार

‘सीआयडी आणि 'आहट' मराठीतून पाहता येणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - टेलिव्हिजनवरील काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करतात आणि त्यांच्या आयुष्याचा भाग देखील होतात. तशाच आजवर टेलिव्हिजन गाजलेल्या मालिका सोनी मराठी वाहिनी आपल्या भेटीस घेऊन येणार आहे. ‘सीआयडी’ आणि 'आहट' या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आजवर या मालिका हिंदी भाषेत आपण पहिल्या पण आता या मालिका मराठीत पाहता येणार आहेत. ‘सीआयडी’ आणि 'आहट' या मालिकांचे विशेष असे काही भाग मराठीमध्ये पाहता येणार आहेत. हा थराराचा १ तास पाहता येईल. सत्याचा शोध घेण्यासाठी येत आहे ए.सी.पी. प्रद्युम्न आणि टीम! ‘सीआयडी’ मालिकेतून ९.३० वाजता भेटीस येणार आहेत तर आता पसरणार सगळीकडे भीतीचे सावट कारण येत आहे 'आहट' १०.३० वाजता पाहता येईल.

टेलिव्हिजनवरील सगळ्यात लोकप्रिय आणि आवडती क्राईम मालिका म्हणजेच सी आय डी (CID). आजवर टेलिव्हिजनवरील सगळ्यात जास्त काळ असलेली मालिका म्हणजेच सी आय डी. या मालिकेतील ऐसीपी प्रद्युम्न, इन्स्पेक्टर दया आणि इन्स्पेक्टर अभिजीत अशी सगळीच पात्र सुपरहिट ठरली. संपूर्ण टीम मिळून घडलेल्या गुन्ह्या मागील सत्य शोधून काढायचे. या मालिकेने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता हाच कार्यक्रम आणि हीच सुपरहिट पात्र मराठीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रेक्षकांची आवडती पात्र आता मराठीतून दिसणार आहेत. तसेच आहट ही एक थ्रिलर, हॉरर टेलिव्हिजन मालिका आहे. जवळ जवळ २० वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्या काळातील सगळ्यात थरारक मालिका ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT