ख्रिस्‍तोफर नोलान Image Source CNN
मनोरंजन

ख्रिस्‍तोफर नोलानची आगामी फिल्‍म ‘या’ ग्रीक महाकाव्यावर

Christopher Nolan | युनिर्वसल पिक्‍चरने केली घोषणा, ऑस्‍कर विजेत्‍यांचा पाहायला मिळणार अभिनय

Namdev Gharal

पुढारी ऑनलाईन डेस्‍कः हॉलिवुडमधील प्रख्यात दिग्दर्शक ख्रिस्‍तोफर नोलान याच्या चित्रपटांची भुरळ जगभरातील रसिकांना पडत असते. नोलान याची फिल्‍म म्‍हणजे भव्य दिव्य सोहळाच, त्‍यामुळे अनेक चित्रपटप्रेमी त्‍याच्या चित्रपटाची वाट पाहत असतात.

प्रत्‍येक वेळी वेगळा आशय- विषय घेऊन येणारा नोलान यावेळी ओडीसी या होमरच्या महाकाव्यावर चित्रपट घेऊन येत आहे. इंटरस्‍टेलर, इन्सेप्शन, द डार्क नाईट, गतवर्षीचा ऑस्‍कर विजेता चित्रपट ओपनहायमर या चित्रपटांचा दिग्दर्शक असलेला ख्रिस्‍तोफर नोलान याने आता जगप्रसिद्ध असलेले, आणि ग्रिक पुराणातील अत्‍यंत महत्‍वाच्या अशा ओडीसी या महाकाव्यावर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे.

युनिवर्सल पिक्‍चर ने या आठवड्‍यात या चित्रपटाची घोषणा केली. ‘ द ओडीसी’ या महाकाव्याचे सिनेमॅटिक ॲडोप्शन करुन याची पटकथा लिहली जाणार आहे. इसवी पूर्व सन ७५० ते ६५० दरम्‍यानच्या राज्‍यकारभारावर ‘होमर’ यांनी ओडीसी हे महाकाव्य लिहले आहे. यामध्ये ट्रोजन यद्ध व त्‍यानंतरचा कालखंड चित्तारला आहे.

ख्रिस्‍तोफर नोलान यांनी एस्‍कवर या चित्रपटाचे पोस्‍टर पोस्‍ट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘पौराणिक ॲक्‍शनपट नवीन आलेल्‍या आयमॅक्‍स (IMAX film technology) चित्रपट तंत्रज्ञावर आधारित असेल असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

झेनद्या, टॉम हॉलंड, रॉबर्ट पॅटीसन, यांच्यासह मॅट डिमन, लुपीता न्युयाँग, ॲनी हॅथवे, आणि चार्लेझ थेरॉन अशी तगडी स्‍टार कास्‍ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. लवकरच याचे शुटिंग सुरु होईल असे युनिवर्सल पिक्‍चरने म्‍हटले आहे. १७ जुलै २०२६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT