पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांची संसद परिसरात अचानक भेट झाली. यावेळी कंगना यांना ते हाक मारताना दिसले. राजकारणात एन्ट्री करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रीने पलटून पासवान यांच्याशी बातचीत केली. यावेळी चिराग पासवान यांनी कंगना यांना आलिंगन देत त्यांची विचारपूस केली. दोघांनीही २०११ रोजी चित्रपट 'मिले ना मिले हम' मध्ये काम केले आहे. संपूर्ण १३ वर्षांनंतर दोन को-स्टार्स भेटले. हा चित्रपट म्हणावा तसा चालला नाही.
अधिक वाचा –
कदाचित खूप कमी लोकांना माहिती असावी, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख चिराग पासवान यांनी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये आपले करिअर २०११ चा चित्रपट 'मिले ना मिले हम' मध्ये कंगना रनौत यांच्यासोबत काम करणे सुरू केले होते. ते एक टेनिस खेळाडूच्या भूमिकेत होते. त्या टेनिस खेळाडूला एका सुपरमॉडलशी प्रेम होतं. चिराग पासवान यांचा अभिनेता ते राजकीय नेतापर्यंतच्या प्रवासाने एक रंजक वळण घेतलं. चिराग पासवान आणि कंगना रनौत दोघांनीही मोठ्या पडद्यावरून राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
अधिक वाचा –
पासवान यांनी बिहारमधील जमुई निर्वाचन क्षेत्रातून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. कंगना रनौत यांनी हिमाचल प्रदेशमधील मंडीतून विजय मिळवला.
संसदेत जेव्हा दोघे भेटले, तेव्हा पहिल्यांदा चिराग पासवान यांनी कंगना रनौत यांना पाहिलं आणि थांबवलं. दोघांनी आलिंगन दिलं आणि नंतर एकत्र फोटो साठी पोजदेखील दिलं. चिराग आणि कंगना दोघांनी एकत्र काही वेळ एकमेकांशी संभाषणदेखील केलं.
अधिक वाचा –