प्रतीक्षा संपली! 'छावा'चा जबरदस्त ट्रेलर या दिवशी होणार रिलीज  Instagram
मनोरंजन

Chhaava Movie | प्रतीक्षा संपली! 'छावा'चा जबरदस्त ट्रेलर या दिवशी होणार रिलीज

प्रतीक्षा संपली! 'छावा'चा जबरदस्त ट्रेलर या दिवशी होणार रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - छावा चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. २२ जानेवारीला ट्रेलर पाहायला मिळणार असून १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तो सिनेमागृहात रिलीज होणार आहे. maddockfilms ने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट जारी केला आहे. त्यामध्ये कॅप्शन लिहिलीय- .Agni bhi woh, Paani bhi woh, Toofan bhi woh, Sher Shiva ka #CHHAAVA hai woh! #ChhaavaTrailer out on 22nd January! Releasing in cinemas on 14th February 2025. #Chhaava #ChhaavaOnFeb14

या चित्रपटामध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात तो मुख्य छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचा धमाकेदार टीझर आधीच रिलीज झाला आहे.

यापूर्वी 'छावा' हा चित्रपट डिसेंबर २०२४ रोजी रिलीज होणार होता. पण, त्यावेळी अनेक चित्रपट प्रदर्शित होणार होते. त्यामुळे 'छावा' या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली होती. आता नव्या अपडेटनुसार, हा चित्रपट १४ फेब्रुवारी, २०२५ रोजी भेटीला येणार आहे. तर २२ जानेवारी रोजी छावा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

चित्रपटात रश्मिका मंदाना छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई भोसले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कलाकारांमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांसारखे दिग्गज कलाकारांचाही समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर यांनी केलं आहे. ज्येष्ठ संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीत दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT