पुढारी ऑनलाईन डेस्क - छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दौडघौड सुरुचं आहे. चित्रपट रिलीजपूर्वीच तुफान प्री-बुकिंगने 'छावा'ची प्रचंड चर्चा झाली. आता पहिल्याच आठवड्याच्या कमाईने छावाने बॉक्स ऑफिसवर शानदार गती पकडलीय. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी एक्स अकाऊंटवर ट्विट केलं आहे. छावाने मने जिंकली अशी कॅप्शन देत कमाईचे आकडेही दिले आहेत. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
'छावा'ने शुक्रवारपर्यंत ३३.१० कोटी, शनिवार ३९.३० कोटी, रविवारी ४९.०३ कोटी, सोमवार २४.१० कोटी, मंगळवार २५.७५ कोटी, बुधवार ३२.४० कोटी, गुरुवार २१.६० असा एकूण २२५.२८ कोटींचा गल्ला जमवला.
या चित्रपटात अभिनेता विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत तर रश्मिका मंदान्ना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे.