पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉक्स ऑफिसवर सध्या चित्रपट 'छावा' गाजत आहे. शानदार कलेक्शनसह विक्की कौशल-रश्मिका मंदाना स्टारर चित्रपटाने 'बाहुबली-२' चा रेकॉर्ड मोडला आहे. चित्रपटाने 'पुष्पा-२' ला देखील मागे टाकले आहे. लक्ष्मण उटेकर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये विक्की कौशल संभाजी महाराजांचा भूमिकेत आहे.
'छावा'ने 'बाहुबली-२' चा रेकॉर्ड मोडत 'छावा'ने २५ दिवसात ५१६ कोटी रुपये कमावले आहेत. तर एस एस राजामौली दिग्दर्शित, प्रभास स्टारर 'बाहुबली-२' ने बॉलीवूडमध्ये ५१० कोटींची कमाई केली होती. सध्या सर्वाधिक कमाई करणारा 'छावा' बॉलीवूडमधील सहाव्या स्थानवर आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी रिलीज झाला होता.
चित्रपटाने वर्ल्डवाईड ७०० कोटींच्या क्लबमध्ये आणि देशात ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केलीय.
मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी 'छावा' ने देशात ५.१५ कोटींचे नेट कलेक्शन केलं आहे. ४ कोटी हिंदी आणि १.१५ कोटी रुपये तेलुगू व्हर्जनमधून कमाई झाली आहे. २६ दिवसात देशात एकूण कमाई ५३०.९५ कोटी रुपये आहे.