दिग्दर्शक मधुर भांडारकर दिग्दर्शित सिनेमा 2001 मध्ये रिलीज होतो आहे. या सिनेमात तब्बू आणि अतुल कुलकर्णी यांचा मुख्य रोल होता. यावेळी त्या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात त्यावेळी स्थान मिळवले होते. आता जवळपास 25 वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल येतो आहे.
सध्या चाँदनी बार पुन्हा एकदा चर्चेत आहे. निर्माता संदीप सिंहने या सिनेमाचे हक्क खरेदी केली आहे. यासोबतच संदीपने या सिनेमाचा सिक्वेल बनवण्याचे ठरवले आहे. (Latest Entertainment News)
संदीप म्हणतात, ‘हा सिनेमा समाजाला आरसा दाखवण्याचे काम करतो. दोन दशकानंतरही अस्तित्व, सन्मान आणि महत्त्वाकांक्षा यासाठीचा संघर्ष तितकाच प्रखर आहे. या सिक्वेलसोबत मी ते सत्य पुन्हा समोर आणणार आहे. अशी गोष्ट सांगणार आहे जो आजच्या पिढीशी जोडले जाईल. चाँदनी बार 2 ची घोषणा झाल्यानंतर फॅन्स खुश आहेत.
चाँदनी बार 2 चे दिग्दर्शन अजय बहल करणार आहेत.
2026च्या सुरुवातीला या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे
हा सिनेमा अंदाजे 2026च्या अखेरीस रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे.