चंडिका चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले Instagram
मनोरंजन

New Year Movie | "चंडिका" पुढील वर्षी येणार, चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

"चंडिका" पुढील वर्षी येणार, चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - महिलांना प्रेरणा देण्याचे कार्य समाजात केले जाते, यापैकीच महत्वाचे योगदान देतात ते म्हणजे चित्रपट. सध्या मराठी सिनेश्रुष्टीत महिलाप्रधान सिनेमांकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलंय. स्त्रीकेंद्री चित्रपटांना सिनेप्रेमींचं प्रेम सुद्धा मिळतंय. असाच एक नवा मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षी आपल्या भेटीस येणार आहे.

आनारसा स्टुडिओज प्रस्तुत, योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आणि निर्मित "चंडिका" ह्या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. वन फोर थ्री (143) आणि आम्ही जरांगे सारखा दमदार आणि सर्वाधिक चर्चेत आलेले चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश भोसले पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहेत. पोस्टरवर असलेल्या महिलेच्या कपड्यांवर आणि अंगावर सर्वत्र रक्त आहे, मागे सध्याचं जग आपण पाहू शकतो. विशेष म्हणजे या महिलेच्या उजव्या हातात शस्त्र आहे ज्याला आपण त्रिशूल म्हणतो. या दमदार पोस्टर वरूनच हा सिनेमा किती ताकदीचा असणार आहे ह्याचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT