Chand Mera Dil teaser released  pudhari photo
मनोरंजन

Chand Mera Dil teaser |कसा आहे 'चांद मेरा दिल'चा टीझर? लक्ष्य लालवानीच्या रोमँटिक लूकने मोडले 'Kill'चे रेकॉर्ड; नेटकरी म्हणाले, 'सैयारा'ची आठवण आली!

Chand Mera Dil teaser | 'लक्ष्य लालवानी' बॉलिवूडचा नवा चॉकलेट बॉय, अनन्या पांडेसोबत चांद मेरा दिलचा रोमँटिक टीझर प्रदर्शित

स्वालिया न. शिकलगार

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा आगामी चित्रपट 'चांद मेरा दिल' चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, यात 'किल' फेम अभिनेता लक्ष्य लालवानी आणि अनन्या पांडे यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. दोघांची केमिस्ट्री पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना टू स्टेटस आणि सैयारा चित्रपटाची आठवण आलीय.

chand mera dil teaser out netizens reacted

'किल' (Kill) चित्रपटातील डॅशिंग लूकनंतर लक्ष्य आता रोमँटिक हिरो म्हणून कसा आहे, हे टीझर मधून सिनेप्रेमींना पाहता येईल. अभिनेता लक्ष्य लालवानीचा चाँद मेरा दिल चित्रपटातील रोमँटिक अवतार पाहून सर्वच जण थक्क झाले आहेत. चाँद मेरा दिल चित्रपटाचा टीझर आज रिलीज झाला असून लक्ष्य आणि अनन्याची केमिस्ट्रीची चर्चा सगळीकडे होतेय.

  • लक्ष्य मूळचा दिल्लीचा असून मॉडेलिंगमधून अभिनयाकडे वळला.

  • लक्ष्यने टेलिव्हिजन मालिकांमधून अभिनयाची सुरुवात केली, ज्यात 'पोरस' ही ऐतिहासिक मालिका अत्यंत गाजली.

  • 'किल' या ॲक्शन चित्रपटातील मुख्य भूमिकेमुळे त्याला मोठी ओळख मिळाली.

  • तो आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' या मालिकेमुळे चर्चेत आला होता.

  • 'किल' चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

'किल' (Kill) चित्रपटात आपल्या रागीट आणि डॅशिंग अवताराने शत्रूंना धडकी भरवणारा लक्ष्य लालवानी आता रोमँटिक भूमिका साकारतोय. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'चाँद मेरा दिल' (Chand Mera Dil) चा टीझर रीलीज झाला असून, यात लक्ष्य एका 'रोमँटिक हिरो'च्या रूपात समोर आला आहे. तो टीझरमध्ये शर्टलेस दिसत असून अनन्यासोबतची त्याची जोडी प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस पडणार, हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच सांगता येणार आहे.

नेटकऱ्यांना का आठवला 'सैयारा'?

टीझरमधील लक्ष्य आणि अनन्या पांडे यांची केमिस्ट्री पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे, टीझरमधील दृश्य पाहून काहींनी सैयाराची तर काहींनी कबीर सिंहची आठवण झालीय. लक्ष्यच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले आहे. अनन्या आणि लक्ष्यच्या रोमँटिक दृश्यांवरही नेटकरी कमेंट्स करत आहेत.

'किल'पेक्षाही जास्त चर्चा?

'किल'मधील त्याच्या ॲक्शन लूकने जितकी खळबळ उडवून दिली होती, त्यापेक्षाही जास्त चर्चा आता त्याच्या 'चॉकलेट बॉय' इमेजची होत आहे. अनन्यासोबतची त्याची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री कोणती जादू चालवते? ह पाहणं उत्सुकतेचं असेल. लक्ष्य हा या वर्षातील बॉलिवूडचा मोठा रोमँटिक स्टार ठरणार, अशा चर्चांना उधाण आले आहे.

काय आहे अनन्या-लक्ष्यची भूमिका?

'चांद मेरा दिल' मध्ये अनन्या पांडे चांदनीच्या भूमिकेत तर लक्ष्य आरवच्या भूमिकेत आहे. दोघे इंजीनियरिंगचे विद्यार्थी असतात. ते युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असतात. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात.

'चांद मेरा दिल' रिलीज डेट

'चांद मेरा दिल' २२ मे, २०२६ रोजी रिलीज होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT