Kargil Vijay Divas Pudhari
मनोरंजन

Kargil Vijay Diwas: कारगील युद्धावेळी अचानक येणाऱ्या फोनची भीती वाटायची; अभिनेत्रीचे वडील होते सैन्यात; दिला कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा

सेलिनाचे वडील दिवंगत कर्नल विजय कुमार जेटली युद्धाच्या दरम्यान एक सक्रिय सेवा अधिकारी होते

अमृता चौगुले

26 जुलै हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. भारतीय सैन्याने शौर्य गाजवत कारगिलमध्ये विजय मिळवला. या दिवासानिमित्त अभिनेत्री सेलिना जेटलीने दिवंगत वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे . सेलिनाचे वडील दिवंगत कर्नल विजय कुमार जेटली युद्धाच्या दरम्यान एक सक्रिय सेवा अधिकारी होते. सेलिना त्यावेळी लहान होती एका व्हीडियोमध्ये तिने वडिलांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

या व्हीडियोमध्ये सेलिना म्हणते, वडील कारगिल युद्धात सक्रिय होते. त्यांची मुलगी म्हणून त्यांचा हा वारसा मी सांभाळून ठेवला आहे. माझ्या वडिलांनी सैनिक म्हणून देशासाठी योगदान दिले आहे.’ पुढे ती म्हणते, मला आठवते, आपल्या तरुण मुलाला युद्धात शाहिद झालेले पाहून आई वडिलांचे भावनाशून्य डोळे, यावेळी पती/ पिता यांना गमावलेल्या युवा वीरपत्नी आणि त्यांच्या मुलांचे अश्रू. ती फक्त एक बातमी नव्हती तर एक दुख होते ज्याने तिथली हवा पण भारलेली होती. हे दु:ख जे सैन्यात असलेल्या प्रत्येकाच्या घराने अनुभवले आहे.

युद्धाचे दिवस भयावह होते

युद्ध सुरू असतानाच्या भीतीदायक दिवसांची आठवण काढताना सेलिना म्हणते, 26 वर्षे झाली तरी आजही ते दिवस आठवले की भीती वाटते. जसे आमचे श्वासच थांबले होते. सतत वाट पहात असायचो. प्रत्येक अनोळखी नंबरवरुन येणाऱ्या फोनची भीती वाटायची. युद्धापरिस्थितीत तुम्ही रोजचे आयुष्य जागत असताच, पण मनाने तुम्ही घरातल्या व्यक्तीसोबत सीमेवर असता. सैन्याचा गणवेश घरातील एकाच व्यक्ति घालत नाही तर संपूर्ण घराने तो अप्रत्यक्ष घातला असतो. घरातील मुले, महिला, वृद्ध व्यक्ति जसे यावेळी मुक योद्धा बनतात. यावेळी प्रत्येक शहिदासोबत आपलेपणा वाटायचा.

सैन्यात असलेली सेलिनाच्या कुटुंबाची चौथी पिढी

सेलिनाचे पणजोबा, आजोबा, वडील आणि आता भाऊही सैन्यात आहे. ती सांगते माझे आजोबा राजपुताना रायफल्सचे कर्नल ई. फ्रान्सिस सैनिक होते. त्याच्या शौर्याच्या गोष्टी आमच्या कुटुंबाचा भाग बनले आहे. पणजोबा आर्मी एज्युकेशन कोरमध्ये कामाला होते. त्यांनी पहिल्या महायुद्धात सेवा बजावली आहे. तर वडील सैन्यात होते. माझ्या भावानेही यांच्यापासून प्रेरणा घेतली आहे. आणि भाऊही पॅराएसएफ अधिकारी म्हणून काम करतो आहे. त्यामुळे सैन्य आणि देशाविषयी प्रेम आमच्या भिनले आहे असे ती म्हणते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT