नो एन्ट्री फेम अभिनेत्री सेलिना जेटली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण आहे- तिचा भाऊ. तिचा भाऊ विक्रांत कुमार जेटली रिटायर्ड जवान आहे. मागील एक वर्षापासून तो यूएई (UAE) च्या तुरुंगात आहे. या प्रकरणी सेलिनाने दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
Celina Jaitly Brother Jail Case
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सेलिना जेटली सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगाला सामोरी जात आहे. तिचा भाऊ विक्रांत जेटली, जो भारतीय सैन्यात सेवेत होता, तो गेल्या वर्षभरापासून संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील तुरुंगात कैद आहे. या पार्श्वभूमीवर सेलिनाने आता कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
सेलिनाच्या मते, विक्रांतवर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये अनेक गैरसमज आणि चुकीची माहिती आहे. तो एक प्रामाणिक आणि देशासाठी समर्पित सैनिक असल्याचं तिने म्हटलं आहे. तिने भारत सरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे देखील मदतीची मागणी केली आहे. मागील एक वर्षापासून सेलिना जेटलीचा भाऊ संयुक्त अरब अमीरात (UAE) च्या जेलमध्ये बंद आहे. तिने आता आपल्या भावासाठी मदतीची विनंती केलीय.
कोर्टात झाली सुनावणी
भाऊ आणि इंडियन लष्कराचे माजी मेजर विक्रांत कुमार जेटलीच्या सुटकेसाठी सेलिना जेटलीने दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. सोमवारी कोर्टामध्ये सुनावणी झाली. सेलिनाचे म्हणणे आहे की, तिच्या भावाला बैकायदेशीररित्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आलं आहे.
भारत सरकारकडून राजकीय आणि कायदेशीर मदत मिळायला हवी, सोबतच सेलिनाने हेदेखील सांगितलं की, तिच्या भावाची प्रकृती ठिक नसते तर त्याच्यावर उपचाराची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जावी.
याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने सांगितले-
परराष्ट्र मंत्रालय याविषयी विक्रांत जेटलीला संपूर्ण मदत करावी. सोबतच सद्यस्थितीतील रिपोर्ट आणि हेल्थ रिपोर्ट दिल्ली हायकोर्टा समक्ष सादर केले जावे. केंद्र सरकारला निर्देश देताना कोर्टाने सांगितले की, या प्रकरणाची हाताळणी करण्यासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करावा. जेटलीच्या पत्नी, बहीण आणि कुटुंबाला पूर्णपणे माहिती द्यावी.
विक्रांत कुमार जेटली तुरुंगात का?
लष्करातून रिटायर्ड झाल्यानंतर विक्रांत कुमार जेटली आपल्या पत्नी सोबत २०१६ मध्ये यूएईमध्ये शिफ्ट झाले होते. तो एक कन्सल्टन्सी फर्ममध्ये जॉब देखील करत होता. २०२४ मध्ये तो आपल्या पत्नी सोबत एका मॉलमध्ये फिरायला गेला तेव्हा यूएई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सेलिनाच्या भावासोबत आरोप आहे की, त्याने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे उल्लंघन झाले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ डिसेंबर रोजी होणार आहे.
सेलिना जेटलीने ‘नो एंट्री’, ‘गोलमाल रिटर्न्स’ आणि ‘अपना सपना मनी मनी’ सारख्या चित्रपटांत काम केलं आहे.