cannes 2026 marathi star 
मनोरंजन

cannes 2026 marathi star | अशोकमामांची रॉयल एंन्ट्री तर प्राजक्ताची ठसकेबाज नऊवारी : कान्समध्ये मराठी तारे तारकांचा जलवा!

पुष्कर जोग, अंकिता वालावलकर, जयंती वाघधरे, केदार जोशी यांचेही रेड कार्पेटवर हजेरी

Namdev Gharal

cannes 2026 marathi star सध्या जगभरातील मिडीयावर कान्स चित्रपट महोत्‍सवाची हवा आहेत. जगभरातील अनेक सेलिब्रेटिंनी या मंचावर हजेरी लावली आहे. हॉलिवूडपासून बॉलिवूड पर्यंत अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनी या महोत्‍सवातील रेड कार्पेटवर आपली छाप उमटवली आहे. यंदाच्या कान्सचे वेगळेपण म्हणजे आपल्या मराठी कलाविश्वातील अनेक आपले चेहरे या महोत्‍सवात दिसले आहे. ही मराठी प्रेक्षकांना सुखावून जाणारी गोष्ट आहे. यामध्ये आपले सर्वांचे लाडके अशोक सराफ व त्‍यांच्या पत्‍नी निवेदिता जोशी, हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी, पुष्कर जोग हे कलाकार रेड कार्पेटवर दिसून आले.

अशोक मामांची एंट्री सफेद डिझायनर जॅकेट व त्‍यावर त्‍यांनी डोळयांना लावलेला गॉगल त्‍यांना रॉयल लुक देत होता. नमस्कार करत त्‍यांनी भारतीय संस्कृतीची झलक दाखवली. तसेच प्राजक्ता माळीचा अंदाज मात्र ठसकेबाज होता तिने महाराष्ट्राची शान नऊवारी नेसली होती. अस्सल नववारीचा बाज व तिचे सौंदर्य यांनी कॅमेऱ्यांच्या नजरा तिच्याकडे वळवून घेतल्या. कान च्या रेड कार्पेटवर अस्सल पारंपरिक नथ- नऊवार नेसून चालण्याचा, जगाला मराठी ठसका दाखवल्याचा आनंद अवर्णनीय आहे. असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे

अशोक सराफ यांचे पहिल्यांदाच रेड कापेटवर पदापर्ण

मराठी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी पहिल्यांदाच कान्सच्या रेड कार्पेटवर पाऊल ठेवले. त्यांनी ऑफ-व्हाइट रंगाचा अतिशय देखणा 'बंदगळा' पारंपरिक जॅकेट परिधान केले होता. रेड कार्पेटवर येताच त्यांनी हात जोडून सर्वांना 'नमस्कार' करत भारतीय संस्कृतीची झलक दाखवली.

तर त्‍यांच्या पत्‍नी ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्यासोबत हातात हात घालून रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. त्यांनी खास पेस्टल हिरव्या-राखाडी रंगाची जरीकाम केलेली पारंपरिक पैठणी साडी नेसली होती. नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, केसात मोगऱ्याचा गजरा आणि हातात 'पैठणी आर्ट'ची डिझायनर क्लच पर्स अशा अत्यंत देखण्या लूकमध्ये त्या वावरल्या.

प्राजक्ता माळीची नऊवारी आणि कोल्हापुरी साज!

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कान्सच्या रेड कार्पेटवर मोरपंखी रंगाची आणि गडद निळ्या काठाची नऊवारी साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या दागिन्यांमध्ये अस्सल महाराष्ट्राचा थाट होता: नाकात पारंपरिक मराठी नथ गळ्यात ठुशी तोडे-बांगड्या यांनी तिचे सौंदर्य आणखीन खुलवले.

लोकप्रिय डिजिटल क्रिएटर अंकिता प्रभू वालावलकर हिनेदेखील या आंतरराष्ट्रीय मंचावर हजेरी लावली. तिने बेबी पिंक रंगाची सुंदर नऊवारी साडी आणि त्यावर मोत्यांचे पारंपरिक दागिने परिधान केले होते.

अभिनेता पुष्कर जोग यानेही यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर पहिल्यांदाच वॉक केला. अत्यंत स्टायलिश आणि क्लासिक लूकमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. "महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर करणे हा माझ्यासाठी सर्वोच्च बहुमान आहे," अशी भावना त्याने व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT