मनोरंजन

मुंबईत २०० कोटींचं घर, दुबईत इतकी प्रॉपर्टी..शाहरुखची संपत्ती आहे तरी किती?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानकडे फोर्ब्सच्या माहितीनुसार, २०२४ मध्ये त्याच्याकडे जवळपास ६३०० कोटी रुपये आहे. ही मोठी रक्कम त्या चित्रपटांतून येते, ज्यामध्ये तो काम करतो. त्याची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट जे चित्रपट बनवते, ज्या ब्रँड्सचा तो प्रचार करतात आणि त्याने गुंतवणूक केलेल्या अनेक गोष्टींमधून किंग खानची कमाई होत राहतो. तो आयपीएल क्रिकेट टीम कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आहे. तो प्रत्येक वर्षी क्रिकेटमधून जवळपास २८० कोटी रुपये कमावतो. आतापर्यंत त्याने ९० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

शाहरुख खानचे शिक्षण झाले तरी किती?

शाहरुख खानचा जन्म २ नोव्हेंबर, १९६५ रोजी नवी दिल्ली येथे झाला होताा. सुरुवातीचे पाच-सहा वर्ष तो आपल्या आजी-आजोबांसोबत मंगलुरुमध्ये राहिला. त्यानंतर तो दिल्लीत आपल्या आई-वडिलांकडे परतला. शालेय शिक्षण राजधानी सेंट कोलंबा स्कूलमधून झाले. १९८८ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून इकॉनॉमिक्समध्ये पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तो मुंबईकडे गेला.

अधिक वाचा-

एका चित्रपटासाठी किती फी घेतो शाहरुख?

शाहरुख खान एका चित्रपटासाठी १५०-२५० कोटी रुपये मानधन घेतो. आपल्या शेवटचा चित्रपट 'पठान'साठी त्याने फी च्या बदल्यात प्रॉफिटचा साठ टक्के हिस्सा घेतला होता. यातून त्याला जवळपास २०० कोटी रुपये मिळाले होते.

जाहिरात आणि प्रमोशन

तो अनेक मोठ्या कंपन्यांसोबत काम करतो. एका दिवसाच्या जाहिरातीच्या शूटिंगसाठी त्याला साडे तीन ते चार कोटी रुपये मिळतात. त्याच्याकडे एक प्रायव्हेट जेटदेखील आहे.

अधिक वाचा-

शाहरुखचा बंगला 'मन्नत' २०० कोटींचा

शाहरुख खानकडे अनेक महाग प्रॉपर्टी आहेत. त्याच्याकडे मुंबईतील आलीशान हवेली मन्नत आहे, त्याची किंमत अंदाजे २०० कोटी रुपये आहे. याशिवाय, शाहरुखकडे लंडनमध्ये एक विला आणि दुबईतील पाम जुमेराहवर एक लक्झरी विला आहे.

अधिक वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT