पुढारी ऑनलाईन डेस्क - सोनाक्षी सिन्हाने लग्नानंतर पहिल्यांदाच होळी साजरी केली. सोनाली, सनी, कार्तिनने फॅन्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या. आज १४ मार्च रोजी जगभरात रंगांचा उत्सव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बॉलीवूडमध्येही अनेक स्टार्सनी होळीचा उत्सव साजरा केला.
सोनाक्षी सिन्हाने लग्नानंतर पहिल्यांदा होळी साजरी केली. फोटोमध्ये पाहू शकता की, सोनाक्षीने व्हाईट कुर्ता आणि सोबत रेड बिंदी लावलीय. गुलालाने भरलेले हात आणि रंगलेल्या चेहऱ्यासोबत तिने फॅन्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच कॅप्शनमध्ये लिहिलं, ''होली है खुशियां मनाओं, रंग बरसाओ. हॅप्पी होली दोस्तों. जटाधारा के शूट से होली की शुभकामनाएं. जहीर मुंबई में हैं और मैं शूट पर हूं. हम साथ में नहीं हैं ठंढा पानी डालो सिर पर.''
सोनाली बेंद्रेने फुलांची होळी खेळली. यावेळी तिने व्हाईट कॉर्ड सूट घातलं होतं. व्हिडिओमध्ये ती खूप सुंदर दिसतेय.
अभिनेता कार्तिक आर्यन देखील होळी खेळताना दिसत आहे. त्याने गुलाल लावताना काही फोटो शेअर केले आहेत. होळीच्या फोटोंमध्ये तो वेगळ्या अंदाजात दिसत आहे.
सनी देओलने यावेळी ब्ल्यू जीन्स-शर्ट सोबत टोपी घातली होती. फोटो शेअर करत त्याने लिहिलं-हॅप्पी होली एव्हरीवन.