पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमधील क्यूट कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना कन्यारत्न प्राप्त झाले असून मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये कियाराने मंगळवारी (दि.१५) गोंडस मुलीला जन्म दिला. कियारा आणि बाळ दोघांचीही प्रकृती सुखरूप असल्याची माहिती माध्यमांसमोर आली आहे. कियारा आणि सिद्धार्थ यांच्या आयुष्यात परीचे आगमन झाल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सिद्धार्थ आणि कियारा हे दोघे २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' या चित्रपटाच्या सेटवर एकत्र आले. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केल्याने त्यांची लवस्टोरी खुलत गेली. ७ फेब्रुवारी २०२३ मध्ये ते विवाहबंधनात अडकले. राजस्थानमधील सुर्यगड पॅलेस येथे त्यांचा मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला. दरम्यान '२८ फेब्रुवारी' ला त्यांनी सोशल मीडियावर आपल्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगत चाहत्यांना 'गूड न्यूज' दिली होती.