गणेशोत्सवासाठी नवे गाणे रिलीज करण्यात आले आहे Youtube
मनोरंजन

Bol Bappa Bol New Ganpati Song | यंदाच्या गणेशोत्सवात वाजणार 'बोल बाप्पा बोल'

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - दरवर्षी गणेशोत्सवात येणारी नवनवी गाणी गणेशभक्तांना आनंद देतात. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात सप्तसूर म्युझिकची निर्मिती असलेलं 'बोल बाप्पा बोल' हे गाणं वाजणार आहे. 'बोल बाप्पा बोल'चा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आला आहे.

सप्तसूर म्युझिकचे साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी बोल बाप्पा बोल या म्यूझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. विजय जोशी यांनी लिहिलेलं गाणं अमेय मुळे यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर तर स्वरा जोशीने हे गाणं गायलं आहे. ईशिता देशपांडे, मृणाल जवंजाळ, स्वरा पाटील यांचा कोरस आहे. 'हळूच येऊन बसतोस तू तोऱ्यात पाटावर, लक्ष तुझं असतं सारं गोड मोदकावर' असे गोड शब्द असलेल्या या गाण्यात गणपती बाप्पाचं आणि उत्सवाचं वर्णन करण्यात आलं आहे.

अॅनिमेशनचा वापर करून करण्यात आलेला हा म्युझिक व्हिडिओ लहान-थोर सर्वांना आवडण्यासारखा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT