कंगना यांनी मुंबईतील बंगला विकला  Instagram
मनोरंजन

BMC ज्यावर बुल्डोजर चालवला तो बंगला कंगना रनौतनी कोट्यवधींमध्ये विकला

Kangana Ranaut | इतक्या कोटींना विकला कंगना रनौत यांचा मुंबईतील बंगला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - भाजप खासदार, बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत यांनी मुंबईत तिचा बंगला कोट्यवधी रुपयांमध्ये विकला आहे. रिपोर्टनुसार, कंगना यांचा हा बंगला मुंबईतील बांद्रा येथील पाली हिल परिसरात होता. हा बंगला तिने ३२ कोटी रुपयांमध्ये विकल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील बांद्रा येथील पाली हिल ठिकाणी असणारा कोट्यवधींचा बंगला खासदार कंगना रनौत यांनी विकला.कोईमत्तूच्या श्वेता बथीजाने खरेदी केला बंगला

कागदपत्रांनुसार, कंगना यांनी हा बंगला सप्टेंबर २०१७ मध्ये २० कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. आता हाच बंगला विकून १२ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. प्रॉपर्टीच्या कागदपत्रांनुसार, यामध्ये खरेदीदार कमलिनी होल्डिंग्सची पार्टनर श्वेता बथीजा यांचे नाव आहे. त्या तामिळनाडूतील कोईमत्तूर येथे राहतात. ५ सप्टेंबर रोजी डीलचे रजिस्ट्रेशन झाल्याचे समजते. कागदपत्रांनुसार, तिचा हा बंगला ३,०७५ वर्ग फूटमध्ये असून त्यामध्ये ५६५ वर्ग फुटांचे पार्किंग स्पेस देखील आहे.

या डीलचे रजिस्ट्रेशन ५ सप्टेंबर रोजी झाले आहे. त्यासाठी १.९२ कोटी रुपये स्टँम्प ड्यूटी आणि ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फी दिली आहे.

BMC ने चालवला होता हातोडा

पाली हिल येथील कंगनाच्या याच बंगल्याचे काही भागाचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत सप्टेंबर, २०२० मध्ये BMC ने बुल्डोजरने तोडले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT