पुढारी ऑनलाईन डेस्क - ब्लॅक, व्हाइट अँड ग्रे- लव्ह किल्स या सोनी लिव्हच्या नवीन डॉक्युड्रामाचे मनाची पकड घेणारा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला, शोच्या जटील व विचारांना प्रवृत्त करणाऱ्या विश्वाची एक छोटीशी झलक हा ट्रेलर दाखवत आहे.
२ मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या या मालिकेत डॅनियल गॅरी या निग्रही पत्रकाराचा प्रवास आहे. आर्थिकृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतून आलेल्या एका अजिबात हाती न लागणाऱ्या तरुणाशी निगडित खुनांचा माग काढण्यासाठी या पत्रकाराने कंबर कसली आहे. डेनियल या तपासात आणखी खोल जातो, तेव्हा भ्रष्टाचार, पितृसत्ता व सामाजिक भेदांचे जाळे त्याला दिसते, सत्य व न्याय यांच्यातील जटीलता सोडवताना अपराध आणि निर्दोषत्व यांच्यातील सीमारेषा धूसर झालेल्या त्याला दिसतात.
या मालिकेत महत्त्वाची भूमिका करणारे मयूर मोरे म्हणाले, “ब्लॅक, व्हाइट अँड ग्रे- लव्ह किल्स या मालिकेचा भाग होणे माझ्या करिअरमधील सर्वांत उत्कट आणि डोळ्यांत अंजन घालणाऱ्या प्रवासांपैकी एक होते. तसेच अखेरीस व्यापक प्रश्न विचारण्याचे धैर्य दाखवून प्रेक्षकांना विचारात पाडते. ही कथा प्रेक्षकांना अस्वस्थ होण्यास भाग पाडते.”
ब्लॅक, व्हाइट अँड ग्रे- लव्ह किल्स या मालिकेचे दिग्दर्शन पुष्कर सुनील महाबलम यांनी केले आहे, तर निर्मिती स्वरूप संपत व हेमल ए. ठक्कर यांची आहे. तिगमांशु धुलिया यांच्यासह मालिकेत अनेक नवीन व प्रतिभावान कलावंत आहे. यांत मयूर मोरे, पलक जैसवाल, देवेन भोजानी, एडवर्ड सोनेनब्लिक, हकीम शाहजहान, अनंत जोग, कमलेश सावंत आदी असणार आहेत.
'ब्लॅक, व्हाइट अँड ग्रे- लव्ह किल्स’ ही खिळवून ठेवणारी कहाणी २ मे पासून सोनी लिव्हवर स्ट्रिमिंग होणार आहे.