पुढारी ऑनलाईन डेस्क : कौटुंबिक मनोरंजन करणारा ‘बिन्नी अँड फॅमिली’ लवकरच प्रेक्षकांची मने जिंकणारे आहे. हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही. हा चित्रपट एकता आर कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्स, निर्माते महावीर जैन फिल्म्स आणि वेव्हबँड प्रॉडक्शन्स आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते शशांक खेतान आणि मृघदीप लांबा यांच्यातील खास सहकार्य आहे.
हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून त्यात #HarGenerationKuchKehtaHai असा संदेश देण्यात आला आहे. तुम्ही कोणत्या पिढीचे आहात हे महत्त्वाचे नाही. ‘बिन्नी अँड फॅमिली’ तुमच्यासाठी आपल्या सर्वांना जोडणारी कथा घेऊन येणार आहे.
चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संजय त्रिपाठी यांनी केले आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या पहिल्या लूक पोस्टरचे अनावरण केले. या पोस्टरमध्ये अंजिनी धवन आणि नमन त्रिपाठी या नव्या कलाकारांची ओळख झाली आहे. या चित्रपटात पंकज कपूर, राजेश कुमार, हिमानी शिवपुरी आणि चारू शंकर यांच्याही भूमिका आहेत.
‘बिन्नी अँड फॅमिली’ ही प्रत्येक पिढीसाठी एक संदेश देणारी कथा आहे. पहिले पोस्टर हे खूप कमालीचं असून आता चित्रपटात काय बघायला मिळणार, हे बघणं उत्कंठावर्धक ठरणार आहे. या चित्रपटाविषयी बोलताना महावीर जैन म्हणाले, "आजच्या काळात आणि गडद चित्रपटांना अधिक महत्त्व प्राप्त होत असताना आम्ही एक संपूर्ण कौटुंबिक चित्रपट घेऊन येत आहोत जो तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासमवेत कोणत्याही बघू शकता. हा चित्रपट प्रत्येक पिढीशी संवाद साधणारा आहे मग तो तरुण असो, किशोरवयीन असो, मध्यमवयीन असो किंवा वृद्ध असो, हा चित्रपट कुटुंबांना एकत्र आणेल आणि तो पाहण्यासाठी मी आमच्या प्रेक्षकांची प्रतीक्षा करू शकत नाही."