अभिनेता मनोज वाजपेयी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. मनोज यांच्या नावाची अचानक चर्चा होण्यामागे एक व्हायरल व्हीडियो आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोज यांचा एका पक्षाचे समर्थन करताना व्हीडियो व्हायरल होतो आहे. हा व्हीडियो पाहताच मनोज यांचे फॅन्स मात्र आश्चर्यचकित झाले आहेत. (Latest Entertainment news)
यानंतर मनोज यांनी स्वत: एक व्हीडियो सोशल मिडियावर शेयर केला आहे. यात त्यांनी हा व्हीडियो फेक असल्याचे सांगितले आहे.
बिहार निवडणुकांचे तापमान जसे जसे वाढत आहे तसे सोशल मिडियावर फेक व्हीडियो आणि मेसेजचा प्रसार वाढतो आहे. असाच एक एडिटेड व्हीडियो समोर आला आहे. ज्यात मनोज वाजपेयी एका पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत. याबाबत अधिक शोधाशोध केल्यावर समोर आले की हा एक जुना व्हीडियो आहे. जो एका अॅडसाथी शूट केला होता. त्याची मोडतोड करून हा व्हीडियो बनवला गेला आहे.
यानंतर मनोज यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरुन एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी हा व्हीडियो फेक असल्याचे सांगितले आहे. याबाबत ते म्हणतात, हा व्हीडीयो पूर्णपणे खोटा आणि संभ्रम पसरवणारा आहे. मी काही वर्षांपूर्वी केलेल्या एका जाहिरातीची मोडतोड करून हा व्हीडीयो बनवला आहे. माझा कोणत्याच राजकीय पक्षाशी संबंध नाही. असे खोटे व्हीडियो माझ्या प्रतिमेला नुकसान पोहोचवतात याशिवाय जनतेलाही संभ्रमात ठेवतात. खऱ्या आणि खोट्यामधील फरक ओळखा.’
मनोज वाजपेयी आगामी फॅमिली मॅन या फ्रँचाईजीमधील आगामी सिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याशिवाय अलीकडेच ते इंस्पेक्टर झेंडे या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.