बिग बॉस फिनालेला आता काही दिवसच बाकी आहेत. जसा जसा शो शेवटच्या टप्प्यात पोहोचतो आहे. शेवटच्या टप्प्यात नवा ट्विस्ट आणण्यासाठी मेकर्स नवे नवे उपाय करत आहेत. आता या शो मध्ये आणखी एक वाइल्ड कार्ड एंट्री आणणार आहेत अशी चर्चा रंगली आहे. पण ही नवी वाइल्ड कार्ड एंट्री कोणी साधा सुधा चेहरा नाही. तर या नव्या एंट्रीचे नाव आहे गझल अलघ. (Latest Entertainment News)
अलीकडेच वीकएंड वारच्या सेटवर गझलला पाहीले गेले. ज्याच्यावरून हा कयास लावला जातो आहे की बिग बॉस 19ची वाईड कार्ड स्पर्धक म्हणून गझल घरात जाऊ शकते. अर्थात तिच्या घरात येण्याने घरातील वातावरण बदलेल यात शंका नाही.
एक यशस्वी उद्योजिका म्हणून गझलची ओळख आहे. मामाअर्थ या ब्युटी ब्रॅंडची को फाउंडरही आहे. हरियाणामध्ये जन्मलेल्या गझल यांनी पंजाब युनिव्हार्सिटीमधून बीसीए केले आहे. त्यानंतर न्यूयॉर्क येथून मॉडर्न आर्ट आणि डिझाईनचा कोर्स पूर्ण केला आहे.
गझलने 1200 रुपये पगारावर करियरची सुरुवात केली होती. पण त्यानंतर तिने हा ब्रॅंड डेवलप केला. आता गझलची नेट वर्थ जवळपास 1200 कोटींची झाली आहे. बिग बॉसच्या एंट्रीबाबत अजून गझलकडून कोणताही खुलासा झालेला आहे.