बिग बॉस फिनालेची अंतिम तारीख समोर Instagram
मनोरंजन

Bigg Boss Marathi Season 5 Finale | बिग बॉस फिनालेची अंतिम तारीख समोर

BBM 5 Finale : ‘बिग बॉस मराठी सीजन 5’ची अंतिम तारीख जाहीर, या दिवशी पार पडणार सोहळा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - बिग बॉस मराठी सीजन ५ अर्ध्यावरच संपणार का असा सवाल प्रेक्षकांना पडला आहे. हा सीझन ऑक्टोबरमध्ये संपवण्यासंदर्भात माहिती समोर आलीय. आता आता बिग बॉसच्या निर्मात्यांकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. निक्की तंबोली, अरबाज, वर्षा उसगावकर, डीपी, अंकिता, पॅडी आदी सर्व स्पर्धकांमुळे हा शो रंगला आहे. या आठवड्याच्या नॉमिनेशनमध्ये अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. यावेळी निक्कीला अश्रू कोसळले.

हे सीझन १०० दिवसांचे नसणार असल्याचे बिग बॉस निर्मात्यांकडून सांगण्यात आलंय. इतकचं नाही तर शोचा फिनाले कधी असणार, याबाबतही जाहीर करण्यात आले आहे.

बिग बॉसच्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांना सांगण्यात आले की, आता फिनालेला १४ दिवस शिल्लक आहेत. ६ ऑक्टोबर ही तारीख देखील सांगण्यात आलीय. यामुळे १०० दिवसांचा खेल ७० दिवसांत संपत असल्यामुळे घरातील सदस्यांना धक्का बसलाय. फिनाले विकमध्ये कोण कोण असणार हे देखील सांगण्यात आलंय.

बिग बॉसच्या घरात सध्या वर्षा उसगावकर, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, निक्की तंबोली, सूरज चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार, कोकणकन्या अंकिता वालावलकर हे स्पर्धक राहिले आहेत. त्यामुळे फिनाले वीकमध्ये कोण राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT