BBM
Instagram  Instagram
मनोरंजन

BBM - सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटला; घरच्यांना फोन लावताच ढसाढसा रडले

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी'च्या घरात कालच्या भागात भावनांच्या खेळात भावशून्य झालेले सर्व सदस्य घरच्यांसोबत फोनवर बोलताना भावनिक झालेलं पाहायला मिळाले. 'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमी हंगामा करणारे सदस्य भावूक झाल्याचे दिसले. 'बिग बॉस मराठी'च्या घरात कधी कोण कोणाचा मित्र होईल आणि कोण कधी कोणाचा दुश्मन होईल हे सांगणं कठिण आहे. त्यामुळे सदस्यांना आपल्या कुटुंबियांची आठवण येणं स्वाभाविक आहे.

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला. या प्रोमोमध्ये सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळाला. घरच्यांना फोन लावताच सदस्य ढसाढसा रडले. प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत, "सदस्यांनी साधला जीवलंगासोबत आपुलकीचा संवाद".

'बिग बॉस'प्रेमींनादेखील अश्रू अनावर झाले. नेहमी एकमेकांसोबत भिडणारे सदस्य आपल्या माणसांकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसले.

SCROLL FOR NEXT