पुढारी ऑनलाईन डेस्क : 'निक्की तांबोळी' हे नाव ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅरिटी शोमुळे चर्चेत आले आहे. तिने स्वत:चं स्थान तयार केले असून तिच्या हजरजबाबी स्वभावामुळे व वादग्रस्त वक्तव्यामुळे ती कायम चर्चेत राहिली आहे. ती आता मोठ्या पडद्यावर झळकणार असून तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
ग्लॅमरस स्टाईलसोबत बोल्ड अदाकारीमुळे चाहत्यांना वेडं लावणारी 'बिग-बॉस मराठी' मधील स्पर्धक निक्की आता पंजाबी चित्रपटसृष्टीत झळकणार आहे. बदनाम हा नवीन पंजाबी चित्रपट येत असून या चित्रपटात ती आयटम साँगमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार असल्याने आणखी काही दिवस चाहत्यांना वाट पहावी लागणार आहे. या गाण्याला सुनिधी चौहान यांनी आवाज दिला आहे. निक्कीबद्दल सांगायचं झालं तर निक्कीने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेल म्हणून केली आहे. त्यानंतर दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतून तिने चित्रपट क्षेत्रात करिअरला सुरूवात केली. साऊथच्या कांचना-3 या ॲक्शन हॉरर चित्रपटात तिने दिव्याची भूमिका साकारली होती. यानंतर तिने अनेक हिंदी रिअॅरिटी शोमध्ये काम करत आपलं एक वेगळं वलय तयार केलं.