'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात (BBM 6) १२ व्या आठवड्यात अत्यंत अनपेक्षित वळण पाहायला मिळाले. फिनालेच्या शर्यतीत असलेला आणि प्रेक्षकांच्या लाडक्या स्पर्धकाला घराबाहेर पडावे लागले आहे. सोशल मीडियावर या स्पर्धकाचे घराबाहेर जाणे काही नेटकऱ्यांना रुचलेलं नाही.
Bigg Boss Marathi 6 famous member eliminate from the house
बिग बॉस मराठी ६ च्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे. 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. दररोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत असतानाच, कालच्या 'भाऊच्या धक्क्यावर' एक असा निर्णय झाला ज्याची कुणीच कल्पना केली नव्हती. घराचा आधारस्तंभ आणि प्रेक्षकांचा आवडता स्पर्धक सागर कारंडे याला घराचा निरोप घ्यावा लागला आहे.
बिग बॉसच्या घरात नेहमीच सरव्हाईव्ह, ॲडजेस्टमेंट करणारा आणि घरातल्या सदस्यांचे पुरेपुर मनोरंजन करणारा सागर कारंडेला घरातून बाहेर जावं लागलं. बिग बॉसच्या घरात विकेंडला नॉमिनेशनचा खेळ रंगला. एकीकडे विनोदवीर सागरचे नाव जाहीर करताच दुसरीकडे विशाल कोट्टीयन ढसाढसा रडलेला दिसला. यावेळी सागर कारंडेही काहीसा भावूक झालेला दिसला.
फिनालेच्या अगदी जवळ येऊन एक्झिट
सागर कारंडे हा या सीझनचा सर्वात शांत आणि समजूतदार स्पर्धक म्हणून ओळखला जात होता. अनेक टास्कमध्ये त्याने आपले कौशल्य दाखवले होते. मात्र, कमी वोटिंग झाल्याने त्याला या आठवड्यात घराबाहेर पडावे लागले आहे. सागर घराबाहेर पडल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप आणि दुःख व्यक्त केले आहे. अनेकांच्या मते सागर हा 'टॉप ५' मध्ये असण्याचा प्रबळ दावेदार होता.
घरात पसरली शांतता
सागरच्या जाण्याने केवळ प्रेक्षकच नाही, तर घरातील सदस्यही भावूक झाले. विशेषतः विशाल निकम आणि अनुश्री माने यांच्या डोळ्यांत पाणी आले. सागरने घराबाहेर पडताना सर्वांना प्रेमाने निरोप दिला. जाताना त्याने आपल्या नावाचा बोर्ड काढू ठेवला.
काय म्हणाले नेटकरी?
तुम्ही सागरला बाहेर काढतात….ज्याने इतके दिवस तिकडे survive केलं….आतापर्यंत सगळ्या चांगले players ला तुम्ही असा बाहेर काढलं, आणखी किती स्ट्राँग कंटेस्टेंटना काढणार?
काय म्हणाला सागर कारंडे?
बिग बॉस सागर कारंडेचा शेवटचा रामराम असे म्हणत सागर घराबाहेर गेला.
आता ट्रॉफीसाठी कोणामध्ये रंगणार चुरस?
सागर कारंडेच्या एक्झिटनंतर आता घरात मोजकेच स्पर्धक उरले आहेत. आता 'ग्रँड फिनाले'कडे सर्वांच्या नजरा लागल्या असून, उर्वरित स्पर्धकांमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.