Bigg Boss Marathi 6 latest update  instagram
मनोरंजन

Bigg Boss Marathi 6 | माफी मागून देखील विरघळलं नाही बिग बॉसचं मन बाऊन्सर्सनी राखीला काढलं घराबाहेर?

Bigg Boss Marathi 6 | माफी मागून देखील विरघळलं नाही बिग बॉसचं मन, बाऊन्सर्सनी राखीला काढलं घराबाहेर?

स्वालिया न. शिकलगार

‘बिग बॉस मराठी 6’मध्ये राखी सावंतला घराबाहेर काढण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. तिने माफी मागितल्यानंतरही बिग बॉसने कठोर निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Bigg Boss Marathi 6 updates

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्ये मोठा वाद आणि ट्विस्ट पाहायला मिळाल्याची चर्चा रंगली आहे. या पर्वात एन्ट्री घेतलेली राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, घरातील तिच्या वागण्यामुळे बिग बॉसला कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.

बिग बॉस मराठी सीझन ६ च्या घरात अभिनेत्री राखी सावंतने एन्ट्री घेतल्यानंतर लक्षवेधी ठरली. वाद असो तिच वागणे...यामुळे बिग बॉसला एक निर्णय घ्यावा लागला. या रिअॅलिटी शोच्या एका नवीन प्रोमोने सर्वांनाच थक्क केले, ज्यामध्ये राखीने घरात मर्यादा ओलांडल्यानंतर बाउन्सर्स तिला बाहेर खेचत असल्याचे दाखवले आहे.

राखीने वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश केला होता, अनेकांना असे वाटले होते की तिच्या उपस्थितीमुळे सीझनचा टीआरपी वाढेल. घरात पाऊल ठेवल्यानंतर लगेचच, 'ड्रामा क्वीन'ने वाद घातला. तिचा वागण्याचा घरातील सर्वच सदस्य आणि निर्मात्यांना त्रास झाला.

राखी सावंतने पार केल्या मर्यादा

व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे राखीने संपूर्ण घर अस्वच्छ केलं आहे. ती बेडवर कचरा फेकते. पण इतक्या मर्यादा ओलांडलेल्या बिग बॉसमध्ये याआधी कधीच पाहण्यात आलं नाहीये. त्यामुळे बिग बॉसला तिच्या विरोधात पावले उचलावी लागली.

व्हिडिओमध्ये बिग बॉस तिला कंफेशन रूममध्ये बोलवतात. त्यानंतर संतप्त बिग बॉस तिला फटकारताना बोलावतत. बिग बॉस म्हणतात- "तू घराचे काय केलेस? आता तुझ्यावर कारवाई केली जाईल. होस्ट रितेश देशमुखने कारवाईची मागणी केली आहे." ती बिग बॉसची माफी मागते. पण बिग बॉस पाऊल मागे घेत नाहीत. बाउन्सर्स तिला खेचत बाहेर आणण्याचा प्रयत्न करतात.

राखी तिच्या बाजू मांडताना दिसते. ती विचारते की, तिने काय चूक केली आणि तिला घराबाहेर काढू नये अशी विनंती करते. माफी मागूनही, बिग बॉस काहीच करत नाही. थोड्याच वेळात, तिला बाहेर काढताना बाऊन्सर्स दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT