'बिग बॉस मराठी ६' च्या घरात सध्या राखी सावंत आणि राकेश बापट यांची जोडी प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करत आहे. राखी सतत राकेशशी फ्लर्ट करत असते, पण आजच्या भागात जेव्हा रितेश भाऊने प्रेमाबद्दल राकेशला विचारले, तेव्हा त्याने अनपेक्षितपणे "हो" असे उत्तर दिले. राकेशचा हा खंबीर होकार ऐकून सर्वांची बोलती बंद करणाऱ्या राखीचीच बोलती बंद झाली. तिला विश्वासच बसत नाहीये.
Bigg Boss Marathi - 6 latest updates today
'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील सर्वात एंटरटेनिंग जोडी म्हणजेच राकेश बापट आणि राखी सावंत यांच्यातील केमिस्ट्रीने सध्या प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले आहे. आजच्या भागात राकेशने राखीला दिलेल्या 'होकारा'मुळे घरात मोठी खळबळ उडाली आहे.
रितेश भाऊ म्हणतो- ''तर सगळ्यात आधी सगळ्यांनाच शॉक देत असतात, त्यांना मी बोलवणार आहे-राखी सावंत. तुमच्यामुळे शॉक बँडला देखील शॉक लागेल. राखी यांचं राकेश वरती प्रेम आहे..होतं...आणि राहणार..''
'मला हे उत्तर राकेश कडून ऐकायचं आहे', असे रितेश भाऊ म्हणाला. यावर राखी राकेशला विचारते..'बोल ना खरं बोल ना'. यावर राकेश म्हणाला-'अगदी खरं'. पण हे उत्तर ऐकून देखील राखी गोंधळते. तिला विश्वासच बसत नाहीये. ती म्हणते - 'अरे तो हो म्हणाला ना?'
रितेश भाऊ म्हणाला-जर नाही म्हटलं तर तुम्हाला जास्त शॉक बसेल.
हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.
राकेश बापट आणि राखी सावंत यांच्यातील ही केमिस्ट्री केवळ मनोरंजनाचा एक भाग असला, तरी सोशल मीडियावर या सीनचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर मजेशीर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात दररोज नवीन राडे आणि वाद पाहायला मिळतात, पण या गदारोळात प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी एक जोडी ठरलीय ती म्हणजे राखी सावंत आणि राकेश बापट. गेल्या काही दिवसांपासून राखी सतत राकेशच्या मागे हात धुवून लागली होती. मात्र, आजच्या भागात राकेशने जे केलं, त्याची कल्पना खुद्द राखीनेही केली नसेल. राकेशने चक्क राखीला प्रेम आहे का यावर 'होकार' दिला आहे, ज्यामुळे राखीचा आनंद गगनात मावेना.