Bigg Boss Marathi 6 todays updates news  pudhari photo
मनोरंजन

Bigg Boss Marathi 6 | 'पॉवर की'ला हलक्यात घेणं पडलं रुचिताला भारी! तिसऱ्याच दिवशी घरात नव्या संकटाची चाहूल!

'बिग बॉस मराठी ६': पॉवर कीचा मोह रुचिताला पडणार भारी? तिसऱ्याच दिवशी घरात नव्या संकटाची चाहूल!

स्वालिया न. शिकलगार

बिग बॉस मराठी 6 च्या घरात खेळाची सुरुवात होताच पॉवर Key मुळे पहिला मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. रुचिताने या पॉवरला हलक्यात घेतल्याने तिच्यावरच संकट ओढवलं असून तिसऱ्याच दिवशी घरातील समीकरणं बदलण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

Bigg Boss Marathi 6 todays latest episode updates

बिग बॉस मराठी-६ ची सुरुवात होताच घरातील खेळ रंगात आला आहे. अवघ्या काही दिवसांतच सदस्यांमध्ये मतभेद, रणनीती आणि सत्ता यावरून वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्येच पॉवर Key हा महत्त्वाचा घटक ठरत असून त्याचा चुकीचा अंदाज रुचिताला महागात पडल्याचे दिसून येत आहे.

पॉवर Key मिळाल्यानंतर घरातील सदस्यांवर प्रभाव टाकण्याची संधी मिळते. मात्र, हीच संधी कशी वापरायची यावर खेळाचे भवितव्य ठरते. रुचिताने पॉवर Key ला फारसं गांभीर्याने न घेतल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतल्यामुळे घरातील इतर सदस्य नाराज झाले आहेत. याचा परिणाम म्हणून तिच्याविरुद्ध वातावरण तयार होत असल्याचे स्पष्ट दिसते.

कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी'च्या घरात तिसऱ्याच दिवशी संकटाची चाहुल लागलीय. पहिल्या दिवशी तन्वीसोबत झालेला राडा आणि त्यानंतर प्रभू शेळकेसोबत भांडम यांमुळे रुचिता जामदार सध्या चर्चेत आहे. अशातच आता एक नवा प्रोमो सोमर आला आहे. प्रोमोमध्ये, बिग बॉसच्या घरातील खेळाला कलाटणी देणारी 'पॉवर की' लक्षवेधी ठरले आहे.

बिग बॉस रुचिताला सांगताना दिसत आहेत पॉवर चेंबरमध्ये येण्यासाठी पॉवर की गरजेची आहे. मात्र, या 'पॉवर की' चा वापर करताना रुचिताकडून काहीतरी मोठी चूक घडल्याचे संकेत मिळत आहेत. ही पॉवर की रुचिताला वाचवणार की तिला थेट अडचणीत टाकणार? तिला नॉमिनेशनमध्ये जावं लागणार का, हे पाहणं ओत्सुक्याचं ठरणार आहे.

दुसरीकडे, करणने पॉवर की देण्यास नकार दिला. रुचिता करणची माफी मागताना दुसरीकडे दिसत आहे. नेमकं काय घडणार, हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. आज रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर आणि जिओहॉटस्टारवर हा शो पाहता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT