Bigg Boss Marathi 6  pudhari photo
मनोरंजन

Bigg Boss Marathi 6 | घरात हळवा करणारा क्षण; करणला ऐकायचाय आई-बाबांचा आवाज, म्हणाला, '१० सेकंद..'

Bigg Boss Marathi 6 | घरात हळवा करणारा क्षण; करणला ऐकायचाय आई-बाबांचा आवाज, म्हणाला, '१० सेकंद..'

स्वालिया न. शिकलगार

बिग बॉस मराठी ६ च्या घरात करणचा एक भावनिक क्षण प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरला. आई-वडिलांचा आवाज ऐकण्याची इच्छा व्यक्त करताना “फक्त १० सेकंद…” असे त्याचे शब्द ऐकून घरातील वातावरण हळवे झाले. या क्षणामुळे करणचा संवेदनशील स्वभाव पुन्हा एकदा समोर आला.

karan emotional in the bigg boss marathi 6 house for parents

बिग बॉस मराठी ६ च्या घरात नेहमीच वाद, टास्क आणि रणनीती पाहायला मिळतात, मात्र कधी कधी असे क्षण घडतात जे थेट प्रेक्षकांच्या काळजाला हात घालतात. असाच एक हळवा आणि भावनिक क्षण नुकताच घरात पाहायला मिळाला, जेव्हा स्पर्धक करणने आपल्या मनात दडलेली भावना व्यक्त केली.

घरातल्या एका संवादादरम्यान करण अचानक भावूक झाला. त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले की, त्याला फक्त आई-बाबांचा आवाज ऐकायचा आहे. “फक्त १० सेकंद जरी मिळाले तरी पुरेसे आहेत,” असे म्हणत त्याने आपली इच्छा व्यक्त केली. यावेळी त्याचे डोळे पाणावले.

बिग बॉस मराठी सीझन ६च्या घरात हळवा करणारा क्षण पाहायला मिळाला. घरातील स्पर्धक करण थोडासा भावूक झालेला दिसतोय. त्याला त्याच्या आई-वडिलांची खूप आठवण येतेय.

दरम्यान, तो घरात बसलेला असताना दीपाली त्याची विचारपूस करते. काय म्हणतोयस करण, कसा आहेस तू...बरं वाटतंय का तुला दीपाली सय्यदने करणची विचारणा केली. त्यावेळी करण थोडासा भावूक झालेला दिसला.

तो म्हणतो- मला मध्ये मध्ये आई-बाबांची आठवण येतेय. मला आई-बाबांचा आवाज ऐकायचा आहे. १० सेकंद दिले तरी मला आवडेल. त्यांचं जगच माझ्या अवतीभोवती असतं. ते चहल पहल पूर्णपणे बंद आहे.

बिग बॉसच्या घरात केवळ वाद, भांडणं नाही तर हळवे क्षणही घडतात. केवळ खेळ नाही, तर मानसिक कसोटीही असते. बाहेरील जगाशी संपर्क तुटलेला, कुटुंबापासून दूर आणि सतत कॅमेऱ्यांच्या नजरेत असणं. पण करणनने ऑन कॅमेरा आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्या पूर्ण होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT