‘बिग बॉस मराठी 6’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून होस्टबाबतची उत्सुकता वाढली आहे. सलमान खान यांनी “ओळखीचं आणि लोकप्रिय नाव” होस्ट म्हणून दिसेल, असं संकेत दिल्यानंतर चर्चांना अधिक वेग आला. त्याने बिग बॉस हिंदीच्या मंचावर रितेश देशमुखचे नाव घोषित करत बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन करणार असल्याचे जाहीर केलं.
salman khan revealed Bigg Boss Marathi 6 host name
मुंबई - ‘बिग बॉस’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या मराठी नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘बिग बॉस मराठी 6’ विषयी अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा रंगल्या होत्या. विशेषतः या सीझनला कोण होस्ट करणार? या प्रश्नाचं उत्सुकता वाढवतं उत्तर अखेर समोर आलं आहे. बॉलिवूड स्टार सलमान खान यांनी एका प्रमोशनल कार्यक्रमात होस्टचे नाव घोषित केल्यामुळे चर्चां होताना दिसते.
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन ६ चा टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. यंदाच्या बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन कोण करणार? असा प्रश्न पडला असताना आता प्रतीक्षा संपली आहे.
या वर्षीही भाऊ म्हणजेच रितेश देशमुखनेच हा सीझन होस्ट करावा, अशी त्याच्या फॅन्सची इच्छा होता आणि अखेर ही इच्छा पूर्ण झाली. थेट बिग बॉस हिंदी शोमध्ये अभिनेता सलमान खानने घोषणा करत रितेश देशमुख यांचे खास स्वागत केले आणि जाहीर केले की बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार.
सलमान खानने रितेश देशमुखचे प्रेमाने आणि दबंग स्टाईलने बिग बॉस हिंदीच्या मंचावर स्वागत केले. 'बिग बॉस नंतर देखील एंटरटेनमेंट सुरूच राहणार आहे कारण लवकरच बिग बॉस मराठी सुरू होणार आहे आणि तो घेऊन येणार आहे माझा लाडका भाऊ रितेश देशमुख. भाऊ तू देशाचा खूप मोठा प्रॉब्लेम solve केला आहेस बिग बॉस हिंदी संपल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी तू घेतली आहेस. यावेळेस नवीन काय असणार आहे, असे तो म्हणाला
काय म्हणाला रितेश देशमुख?
रितेश देशमुख म्हणाला, "पहिले तर तुम्हाला ब्लॉकब्लस्टर सिझनसाठी खूप शुभेच्छा. मी रोज बघतोच आहे, सगळ्यांना देखील हा सिझन खूप आवडतो आहे. यावेळेस मराठी सिझनमध्ये आपण एका दरवाज्यातून सदस्यांचे स्वागत करतोच पण आता आत गेल्यानंतर खूप दरवाजे त्यांचे स्वागत करणार आहेत. प्रत्येक दरवाज्यामागे काहीतरी लपलेलं असणार आहे. काहीवेळेस चांगल्या गोष्टी असतील, काहीवेळेस shocking गोष्टी असतील. म्हणजेच दरवाज्यामागे काही ना काही असणार आहे."
सोबत रितेश देशमुख यांनी एक एलिमेनेशन देखील केले, सदस्यांसोबत संवाद देखील साधला.
“दार उघडणार… नशिब पालटणार… भाऊ येणार!” बिग बॉस मराठीचा हा सिझन वाजणार. ही टॅगलाईन घेऊन बिग बॉस मराठी सिझन ६ कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर येणार आहे.
‘बिग बॉस मराठी 6’ चं शूटिंग लवकरच सुरू होणार असून सेट डिझाइन, स्पर्धकांच्या निवडीपासून ते शोच्या टायटल ट्रॅकपर्यंत सर्व तयारी गतीने सुरू आहे. या सीझनमध्ये काही खास ट्विस्ट, अनपेक्षित टास्क आणि नवीन थीम पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जातंय.