'बिग बॉस मराठी'चा महाअंतिम सोहळा जवळ येत असतानाच घरामध्ये जुन्या स्पर्धकांची एन्ट्री पाहायला मिळत आहे. मागील पर्वाचा उपविजेता आणि प्रेक्षकांचा लाडका गायक अभिजीत सावंतने घरात जाऊन आपल्या मित्र-मैत्रिणींना सुखद धक्का दिला. केवळ सल्लेच नाही, तर अभिजीतने आपल्या सुमधुर आवाजात "तुम बिन" चित्रपटातील एक गाणं सादर केलं. हा क्षण इतका भारावून टाकणारा होता की, घरातील स्पर्धकांसह प्रेक्षकही पुन्हा एकदा त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडले आहेत.
abhijeet sawant reentry bigg boss marathi
'बिग बॉस मराठी'च्या घराला आता महाअंतिम सोहळ्याचे वेध लागले आहेत. शोचा प्रवास संपायला काहीच दिवस उरले असताना, बिग बॉसने प्रेक्षकांसाठी आणि स्पर्धकांसाठी एक मोठं सरप्राईज प्लॅन केलं आहे. या जादुई घरात पुन्हा एकदा मागील पर्वाचा लोकप्रिय स्पर्धक आणि प्रख्यात गायक अभिजीत सावंतने पाऊल ठेवलं आहे. अभिजीतच्या या एन्ट्रीने घरातील वातावरणात आनंदाची लाट पसरली आहे.
जुन्या आठवणी झाल्या ताज्या
अभिजीत सावंतने मागील पर्वात आपल्या खेळीने आणि आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली होती. तो त्या पर्वाचा उपविजेता ठरला होता. आता पुन्हा एकदा त्याला या घरात जाण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. घरात प्रवेश करताच आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना पाहून तो भारावून गेला. त्याने सर्वांना खेळासाठी मोलाचे सल्ले तर दिलेच, पण त्यासोबतच एक असं 'सरप्राईज' दिलं ज्याची कोणाही कल्पना केली नव्हती.
तुम बिन गाण्याने जिंकली मनं!
नुकत्याच समोर आलेल्या नवीन प्रोमोमध्ये, अभिजीत सावंत घरातील सदस्यांसाठी 'तुम बिन' या प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटातील एक गाणं गाताना दिसत आहे. अभिजीतचा आवाज आणि त्या गाण्यातील भावना यामुळे घरातील प्रत्येक सदस्य मंत्रमुग्ध झाला. स्पर्धकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल
अभिजीतच्या या सुमधुर परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बिग बॉसच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यात संगीताची मैफल रंगलीय. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसाठी ही एक खास पर्वणी आहे.
अंकिता वालावलकरची एन्ट्री
अभिनेत्री अंकिता वालावलकरने देखील अभिजीत सावंतसोबत बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतलीय. त्यामुळे बिग बॉसच्या घराचा माहोल अधिक धमाकेदार होणार आहे.