Bigg Boss Marathi 5  Nikki Tamboli-Varsha Usgaonker 
पहिल्याच दिवशीच वर्षा उसगावकर-निक्की तंबोली यांच्यात 'तू तू- मै मै'  Instagram
मनोरंजन

Bigg Boss Marathi 5 : पहिल्याच दिवशी वर्षा उसगावकर-निक्की यांच्यात 'तू तू- मै मै'

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू झाला असून यंदा घरात १६ महारथी दाखल झाले आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात एकीकडे सदस्यांना पाणी नसणं, नाश्ता न मिळणं या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे सदस्यांची चांगलीच चिडचिड होताना पाहायला मिळत आहे. एकंदरीतच पहिल्या दिवसापासूनच सदस्यांचं खरं रूप प्रेक्षकांसमोर आलं आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री निक्की तंबोली यांच्यात पहिल्या दिवशीच 'तू तू मै मै' झालेलं पाहायला मिळालं.

घर म्हटलं की एकत्र नांदता नांदता भांड्याला भांड लागतंच. त्यामुळे 'बिग बॉस मराठी'च्या घरातही सदस्यांमध्ये 'तू तू मै मै' झालेलं पाहायला मिळालं. 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात वर्षा ताई मेकअप करताना दिसल्या. दरम्यान निक्की येऊन वर्षाताईंना म्हणते,"तुम्ही कृपया नंतर मेकअप करा". त्यावर वर्षा ताई निक्कीला म्हणतात,"मला थोडं तयार व्हायलाच पाहिजे... तू व्यवस्थित तयार झालीस". पुढे निक्की वर्षाताईंना म्हणते,"लिपस्टिक नंतर लावा..आधी बाहेर येऊन बसा..लिपस्टिक कोणी नाही पाहत तसंही...".

सर्व सदस्य बेडरुमध्ये मेकअप करणाऱ्या वर्षा उसगावकर यांना बाहेर बोलावतात. आहेत. तुमच्यामुळे 'बिग बॉस'देखील थांबलेत असं घरातील इतर सदस्य वर्षा उसगावकर यांना म्हणतात.

SCROLL FOR NEXT