भिजीत केळकरने घरात झालेल्या प्रसंगाबद्दल राग व्यक्त केला  Instagram
मनोरंजन

BB Marathi 5 |वर्षा उसगावकरांच्या मातृत्वावर बोलणाऱ्यांवर अभिजीत केळकरचा संताप

वर्षाताई तुमच्या संयमाला सलाम; अभिजीत केळकरचा 'मातृत्व'वर बोलणाऱ्यांबद्दल संताप

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - लोकप्रिय, दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या मातृत्वावरून निक्की तंबोलीने केलेल्या वक्तव्यामुळे निक्कीला ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावरही या वक्तव्याची चर्चा सुरु आहे. आता अभिनेता अभिजीत केळकरने देखील संताप व्यक्त करत इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आणि बिग बॉस मराठीच्या घरात झालेल्या गोंधळावर प्रतिक्रिया दिली.

अभिजीत केळकर काय म्हणाला पोस्टमध्ये?

''...एखाद्या बाईच्या मातृत्वावर बोलताना ती कधी आई झाली आहे की नाही आणि ते आपल्याला माहीत आहे की नाही हे कसं मॅटर करतं? मुळात दुसऱ्याच्या इतक्या खाजगी आणि संवेदनशील विषयावर बोलणाऱ्या माणसांचं मानसिक आरोग्य पुन्हा एकदा तपासायला हवं... पण वर्षा ताई, तुमच्या संयमाला सलाम @varshausgaonker ताई, तुमच्या संयमाला सलाम🙏 ...शाब्बास @kokanheartedgirl अंकिता, तू करेक्ट स्टँड घेतलास 🤜🔥🤛''

नेमकं काय घडलं 'बिग बॉस मराठी'च्या घरात?

बिग बॉसच्या घरात छोट्या पाहुण्यांना सांभाळण्याच्या टास्कमध्ये टीम ए जिंकली. पण निकी आणि वर्षा उसगावकर यांच्यात एक वाद झाला. निकीने वर्षा यांच्या मातृत्वाबद्दल भाष्य केलं, ज्यावरून प्रेक्षक नाराज झाले आणि निक्कीवर टीकाही झाली.

काय म्हणाली निक्की तंबोली?

घरात टास्क सुरू होते. त्यावेळी निक्कीने B टीमच्या सदस्यांच्या बाहुलीचा एक पाय तोडला. बाहुलीची मुंडी, तंगडं तोडलं यावर उत्तर देताना निक्की म्हणाली, ''यांच्या भावना बघितल्या का? आईचं प्रेम कसं समजेल जाऊ देत. एका आईचं प्रेम काय असतं तुम्हाला काय माहिती?''

निक्कीच्या बोलण्याने वर्षा उसगावकरचे फॅन्स, प्रेक्षकच नव्हे तर बिग बॉसदेखील रागावले.

अंकिता वालावलकर रागावली

अंकिता हे वाक्य ऐकताच भावूक झाली. ती रागात निक्कीला म्हणाली, ए…तुझं हे बोलणं अतिशय चुकीचं आहे. निक्की म्हणाली, हे तू मला सांगू नकोस. या स्वत: तंगडं तोडलं म्हणाल्या आणि मला भावनांबद्दल सांगतात. निक्कीचा हा अरेरावीपणा पाहून वर्षा यांनी म्हटलं, “तू जे केलंय तेच मी सांगितलं… शब्द हे बाणासारखे असतात आणि ते परत घेता येत नाहीत एवढं लक्षात ठेव निक्की, एकदा बाण गेला की गेला.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT