घनश्याम दराडे बिग बॉस मराठी ५ मध्ये दिसत आहे colours Marathi Instagram
मनोरंजन

Bigg Boss Marathi 5 : पोल खोलायला आला घनश्याम दराडे, बिग बॉस मराठी ५ मध्ये एन्ट्री

Ghanshyam Darade -बिग बॉस मराठी पोल खोलायला आला घनश्याम दराडे

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बोलण्याच्या लकबीमुळे प्रसिद्ध झालेला घनश्याम दराडे आता बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये दिसत आहे. छोटा पुढारी म्हणून त्याची ओळख आहे. घनशाम दराडे हा बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये काय धुमाकूळ घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कलर्स मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घनश्याम दराडेचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. (Bigg Boss Marathi 5) या फोटोला कॅप्शन लिहिण्यात आलीय-'नेहमी राजकीय सभा गाजवणारा छोटा पुढारी, घनःश्याम दरवडे येतोय आता गाजवायला बिग बॉस मराठीचा मंच. मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’चा Grand Premiere ‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर'

घनश्याम दराडेचे वय किती?

घनश्याम दराडेचे वय अंदाजे २१-२२ असावे, असे सांगितले जात आहे.

गौतमी पाटीलवर कॉमेंट करून वादग्रस्त ठरला होता घनश्याम दराडे

गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करून मोठं होऊ नये. तसेच तिच्या अदा बदलाव्यात, असं तो म्हणाला होता. त्याच्या वादग्रस्त विधानावर गौतमी पाटीलने संताप व्यक्त केला होता. ‘आता ताईला समजून सांगणे गरजेचे आहे, नाहीतर मी ताईला ओपन चॅलेंज देतो त्यांनी बिहारमध्ये जावं. तुम्ही बदल करणार नसाल तर महाराष्ट्रात तुम्हाला थारा नाही’, असा इशाराही घनश्याम दरोडे याने गौतमी पाटील हिला दिला होता. यावर गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया देत म्हटले होते की- “मी घनश्यामला एकच सांगते, तू आधी माझ्या कार्यक्रमाला ये. माझा कार्यक्रम बघ. त्यानंतर काही आरोप करायचे असतील तर कर. आधी मला दाखव की मी काय चुकतेय. तू थेट माझ्यावर आरोप करशील तर मी सुद्धा ऐकून घेणार नाही. तू आधी कार्यक्रम बघ मग बोल.”

आता बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये घनश्याम दराडेने किती रोखठोक बोलणार, भल्याभल्यांची पोल खोलणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT