बिग बॉस सीझन 19च्या घरात काल दुसऱ्या वाइल्ड कार्डची एंट्री झाली. अर्थात या एंट्रीने घरात अजून मसाला अॅड झाला नाही तर नवलच. या आठवड्यात क्रिकेटर दीपक चहरची बहीण मालती चहर बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे. (Latest Entertainment News)
या एपिसोडच्या सुरुवातीला दीपक चहर स्वत: स्टेजवर आला. त्याने बहीण मालतीचा एकदम धमकेदार अंदाजात परिचय करून दिला. मालतीने घरात प्रवेश केल्यावर घरातले सदस्य तिचे स्वागत करायला पुढे आले.
मालती घरी आल्यानंतर सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले. खासकरून शहाबाज बदेशा आणि नीलम तिच्याशी बोलत बसले. अर्थात तान्याला हे बिलकुल आवडले नाही. नीलम तिला म्हणाली की, 'मालती दिसायला छान आहे.’ यावर तान्याने लगेच वळून उत्तर दिले की, 'मला तरी असे वाटत नाही.’
याशिवाय मालतीच्या लक्झरी लाईफस्टाइलबाबतही टोमणा मारताना ती म्हणाली की, ‘ती तर स्वत:च्या प्रेमात आहे.’ यावर मालतीने म्हणते की ' हो मी सेल्फ ऑब्सेस्ड आहे. आणि मला याचा गर्व आहे.’