बिग बॉसच्या 19 व्या सीझनची सुरुवात अगदी काही तासांवरच येऊन ठेपली आहे. अलीकडेच मेकर्सनी बिग बॉस 19च्या घराची एक झलक शेयर केली आहे. यावेळी घराचा अंदाज काहीसा हटके आहे. लोकशाही या थीमवर आधारलेल्या या घरची रचना ही तितकीच हटके आहे. (Latest Entertainment News)
पूल एरिया
लॉन एरिया
जीम एरिया
घरात 100 कॅमेरे
या सीझनचा हॉल लाकडी डिझाईनवर बेस्ड दिसतो आहे. या शिवाय प्राण्यांचे विविध आकार लक्षवेधी आहेत. काही सीक्रेट खोल्या देखील आहेत. ज्या हळूहळू समोर येतील. जंगलात असलेल्या लॉग हाऊसप्रमाणे या घराची रचना केली आहे.
हा सीझन लोकशाही थीमवर बेस असल्याने असेंबली रूम या सीझनचे मुख्य आकर्षण आहे. यामध्ये सदस्यांना चर्चा आणि वादविवाद करता येणार आहे. वी शेप असलेल्या या रूमच्या बाजूला टेबल आणि खुर्च्या आहेत. तर मध्ये माइक आहे.
यावेळी कन्फेशन रूमची डिझाईन आकर्षक रंगसंगतीने सजलेली आहे. त्यावर गरुडाची डिझाईन केली आहे
या सीझनचे वैशिष्ट म्हणजे बाकीच्या सीझनप्रमाणे यात जेल असणार नाही
या घरचा बेडरूम एरिया वूडन थीमवर आधारलेला आहे.
बिग बॉसच्या प्रत्येक सीझनच्या थीमनुसार घरची बांधणी केली जाते. हे घर बनवायला आणि सीझन संपल्यानंतर तोडायला जवळपास 3 ते 3.5 कोटी रुपये खर्च येतो.
तुम्हाला माहिती आहे का या घरात असलेल्या जीमचे सगळे एक्विपमेंट्स सलमानकडून दिले जातात. ज्याचे सलमान कोणतेही पैसे घेत नाही.
या घरात वापरले जाणारे सोफे, बेड, खुर्ची, एसी, टिव्ही हे सगळे सामान रेंटवरुन आणले जाते.
गोरेगाव फिल्मसिटीमध्ये बिगबॉसचे घर आहे.