Bigg Boss 19 contestant  x account
मनोरंजन

Bigg Boss 19 | पहिल्याच दिवशी एलिमिनेशनची टांगती तलवार; कंटेंस्टेंटमध्ये जोरदार भांडण

Salman Khan | पहिल्या एलिमिनेशनवरून कंटेंस्टेंटमध्ये जोरदार भांडण, कुनिकाने मृदुलला म्हटलं..लीडर बनू नकोस!

स्वालिया न. शिकलगार

bigg boss 19 Baseer Ali Mridul Tiwari Kunickaa Sadanand dispute

मुंबई - रिॲलिटी शो बिग बॉसचा १९ वा सीजन सुरु झाला आहे. १६ नव्या कंटेस्टंटनी एंट्री घेतली असून पहिल्याच दिवशी एलिमिनेशनची टांगती तलवार स्पर्धकांवर दिसतेय. शोच्या ग्रँड प्रीमियर नंतर आता पहिल्या एपिसोडमध्ये काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण यावेळी खेळाच्या पहिल्या दिवशी एका मोठ्या ट्विस्ट सह पहिले एलिमिनेशन होणार आहे. सुरुवातीला बिगा बॉसने कंटेंस्टेंटना काय झटका दिलाय, पाहुया.

बिग बॉसच्या घरात खुर्ची १५ आणि सदस्य १६ आहेत. बिग बॉसने सर्व सदस्यांना मीटिंग हॉलमध्ये बोलावून ही माहिती दिलीय. ज्याचा प्रभाव कमी असेल, आणि जो घरात राहायला लायक नाही, अशा सदस्याचे नाव तुम्हाला मिळून ठरवायचं आहे. म्हणजेच पहिल्याच दिवशी एका सदस्याचे एलिमिनेशन होणार. यानंतर बिग बॉसच्या घराचे वातावरण आणखी तीव्र झालं.

बिग बॉसच्या घरात वादाला सुरुवात

एलिमिनेशनच्या चर्चेनंतर घरात वादाला सुरुवात झाली. बशीर अली, मृदुल तिवारी यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आपली बाजू मांडली. अभिनेत्री कुनिका सदानंदने बशीरला पाठिंबा दिला. मृदुलला फटकारत म्हटलं - “लीडर बनू नकोस, फक्त एक नाव सांग.”

कंटेंस्टेंटच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट झालं की, मृदुल तिवारी सर्वांच्या निशाण्यावर आहे, एलिमिनेशनसाठी त्याचे नाव सर्वात पुढे आहे.

मृदुल तिवारीने जनतेच्या वोटिंगच्या माध्यमातून या शोमध्ये एंट्री घेतली होती. शहबाज बादेशाहला त्याने मागे टाकले होते. त्याचे सोशल मीडिया फॅन फॉलोईंग तगडे आहे.

सलमानखान म्हणाला...'मला खरं प्रेम झालं...'

बिग बॉस १९ चा होस्ट सलमान खानने ग्रँड प्रीमियर एपिसोडमध्ये कंटेंस्टेंटची ओळख करून दिली. शोच्या पहिल्या दिवशी सलमान खानने कंटेंस्टेंट तान्या मित्तलशी बातचीतवेळी आपल्या प्रेमाबद्दल खुलासा केला.

परिचय करून देताना सलमानने तान्याला विचारले की, तिने गँग्स ऑफ वासेपूर चित्रपट पाहिलाय का? ती म्हणाली, नाही पाहिला. त्यानंतर सलमानने पुन्हा तिला विचारलं की, कोणत्या प्रकारचे चित्रपट पाहायला आवडतात? तान्या म्हणाली, प्रेम रतन धन पायो चित्रपट पाहिला आहे. यावेळी तान्याने सलमानला विचारलं की, "सर, खरं प्रेम नेहमी अधुरे राहते काा?" यावर सलमान म्हणाला, "खरं प्रेम, मला नही माहिती... कारण आतापर्यंत झालं नाही...न खरं प्रेम झालं, न काही अधुरे प्रेम राहिले आहे".

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT