पुढारी ऑनलाईन डेस्क - टाईम का तांडव थीम नंतर, बिग बॉस १८ ने रवी किशन यांच्यासोबत एक स्पेशल संडे सेगमेंट आणणार आहेत. 'हाय-दैय्या विथ रवी भैया -गरदा उडा देंगे' अशी टॅगलाईनचा व्हिडिओ समोर आला आहे. सलमान खानद्वारा होस्ट केलेला हा शो आधीपासूनच आपल्या ड्रामामुळे चर्चेत आहे. तर रवीकिशन यांची एन्ट्री हाय-स्टेक ड्रामा वीकेंड का वारला अधिक धमाकेदार होण्यासाठी तयार आहे. दरम्यान, नव्या प्रोमोनेदेखील प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
नव्या प्रोमोमध्ये रवीकिशन बाईकवर भोजपुरी स्टाईलमध्ये एन्ट्री घेतात. रविवारी बिग बॉस १८ रवि किशन यांच्यासोबत हाय दैया रवी भैया नावाचा एक सेशन घेऊन आले आहेत. एन्ट्री टाईमवर रवी म्हणतात- हाय दैया, मैं रवि भैया, गर्दा उडा देंगे.
रवीकिशनने म्हणाले, 'बिग बॉस भारतीय टेलिव्हिजन जगतात एक अमूल्य स्थान आहे आणि माझ्यासाठी या शो चा एक भाग होणे खूप शानदार अनुभव आहे. हे माझ्य़ासाठी खरचं खूप खास आहे. कारण मी या शोचा खूप मोठा फॅन आहे'.