रजत दलाल बिग बॉस १८मध्ये दिसणार  instagram
मनोरंजन

कोण आहे Bigg Boss 18 चा स्पर्धक रजत दलाल? वादग्रस्त लाईफमुळे चर्चेत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - टीव्हीचा सर्वात चर्चित आणि कॉन्ट्रोव्हर्शियल रिॲलिटी शो बिग बॉस - १८ ची सुरुवात झाली आहे. शोच्या ग्रँड प्रीमियरमध्ये प्रेक्षकांना १८ व्या सीझनच्या सदस्यांची ओळख करून दिली गेली. बिग बॉस १८मध्ये रजत दलाल चीदेखील एन्ट्री झाली आहे. रजत दलाल विषयी जाणून घेऊया. रजत दलाल एक फिटनेस इन्फ्लूएन्सर आहे. तो पॉवर रेस्लिंगमध्ये त्याने अनेक पदके जिंकली आहेत. जबरदस्त शरीरयष्टी आणि वर्कआऊटचे व्हिडिओ रजत सोशल मीडियावर शेअर करत राहतात.

कॅरी मिनाटीशी पंगा

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर कॅरी मिनाटी सोबत झालेल्या वादानंतर रजत दलाल प्रकाश झोतात आला होता. कॅरी मिनाटी सोबत झालेल्या वादामुळे त्याची सोशल मीडियावर लोकप्रियता आणखी वाढली.

काय होतं प्रकरण?

कॅरी मिनाटीने आपल्या व्हिडिओमध्ये रजतच्या सिग्मा मेल्सवर दिलेल्या व्ह्यूजची खिल्ली उडवत माइटी राजू बोलावलं होतं आणि म्हटलं होतं की, त्याचा माईंडसेट मुलांसारखा आहे. कॅरी मिनाटी सोबत वादानंतर त्यांचे इन्स्टाग्राम लाईव्ह पर्यंत बंद करण्यात आले होते.

बाईक टक्करचे प्रकरण

रजत दलालचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो रस्त्यावर वेगवान कार चालवताना दिसला होता. त्याच्यासोबत एक मुलगी देखील होती. या दरम्यान, तो एका बाईक्वारला टक्कर मारतो. जेव्हा त्याच्या बाजूला बसलेली मुलगी विचारते, तेव्हा तो म्हणतो की, हे तर त्याचे रोजचे काम आहे.

चेहऱ्यावर शेण लावल्याचा आरोप

रजत दलालवर याचवर्षी जूनमध्ये एक तरूणाशी मारहाण आणि त्याच्या चेहऱ्यावर शेण लावल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात देखील घेतले होते.

याआधी रजत दलाल आणि फिटनेस ट्रेनर राजदीप सिसोदिया यांच्यात भांडणदेखील झालं होतं. दोघांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून एकमेकांशी लढण्याची इच्छा जाहिर केली होती. जेव्हा या प्रकरणाने सोशल मीडियावर गती पकडली, तेव्हा फरीदाबाद पोलिसांनी हे प्रकरण शांत केलं.

रजत दलालचे सोशल मीडियावर किती फॉलोअर्स?

रजत दलालच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी कमाई होते. इन्स्टाग्रामवर त्याला १.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. यूट्यूबवर त्याचे २३२k सस्क्रायबर आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT