अमिताभ बच्चन Instagram
मनोरंजन

'बिग बी'चं टेन्शन वाढलं ! ८२ वर्षीय अमिताभ यांना सतावतेय 'या' गोष्टीची चिंता

Amitabh Bachchan | नेटकऱ्यांच्या ट्रीक्सवर अमिताभ असामाधानीच; पोस्ट करत नाराजी व्यक्त

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध आहेत. ऑन-स्क्रीन अभिनय, कौन बनेगा करोडपती आणि सोशल मीडियावरील त्याच्या पोस्ट शैलीचे प्रत्येकजण चाहते आहेत. ८२ वर्षीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे एक ट्विट पुन्हा व्हायरल झाले आहे, ज्यामध्ये ते एक्सवरील (X) वाढत्या फॉलोअर्सबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांचे इंस्टाग्रामवर ३७.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर त्याचे ४९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. अलीकडेच ८२ वर्षीय बच्चन यांनी त्यांचे ४९ दशलक्ष फॉलोअर्स वाढवू न शकल्याबद्दल चिंता व्यक्त करणारे एक पोस्ट शेअर केली आहे, जे वेगाने व्हायरल होत आहे आणि चाहते त्यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी सोमवार १४ एप्रिल रोजी रात्री १२:०९ वाजता इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, "मी खूप प्रयत्न करत आहे, पण ४ कोटी ९० लाख फॉलोअर्सची संख्या वाढत नाहीये. जर काही उपाय असेल तर सांगा." अमिताभ यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी अमिताभ यांना अनेक उपाय सुचवले आहेत.

'X' फॉलोअर्स वाढण्यासाठी नेटकऱ्यांनी सुचवल्या या ट्रीक्स

एक्सचे (X) फॉलोअर्स वाढण्यासाठी अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांनी अनेक ट्रीक्स सुचवल्या आहेत. त्यापैकी 'कोणी बातमी शेअर करण्यास सांगितले, कोणी राजकीय मुद्द्यांवर मत देण्यास सांगितले. इतकेच नाही तर अनेकांनी त्यांना त्यांची पत्नी जया बच्चन यांच्या सोबतचा फोटो शेअर करण्याचा उपायदेखील सांगितला आहे. यामुळे ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

यापैकी काहीही काम केले नाही; अमिताभ यांची प्रतिक्रिया

अमिताभ यांनी एक्स (X) अकाऊंटवरील त्याचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी सांगितलेल्या ट्रीक्ससाठी त्यांनी नेटकऱ्यांचे आभार मानले आहेत. अभिताभ यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, " फॉलोअर्स वाढवण्यात मदत करणाऱ्या अनेक उदाहरणे देणाऱ्या सर्वांचे आभार. माफ करा परंतु, यापैकी काहीही काम केले नाही", अशी प्रतिक्रियादेखील अमिताभ बच्चन यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT