भूषण प्रधान-शिवानी सुर्वे  
मनोरंजन

Bhushan Prdhan-Shivani surve : अरेन्ज मॅरेज ही लव्ह स्टोरी बनू शकते? भूषण-शिवानीचा चित्रपट ऊन-सावली

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऊन सावली चित्रपटाच्या 'टायटल सॉंग'ला चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाचे पोस्टर आणि टीजर लाँच करण्यात आले. ऊनामुळे लागणारे चटके आणि सावलीची शीतलता दोन्ही प्रेमाच्या रूपात पाहायला मिळणार आहे. (Bhushan Prdhan-Shivani surve) आम्ही दोघी, टाईमपास २, फेम ऍक्टर भूषण प्रधान आणि त्यांच्या सोबत वाळवी आणि झिम्मा २ असे बॅक टू बॅक हिट सिनेमा देणारी एक्टरेस शिवानी सुर्वे ह्या दोघांची जोडी पाहायला मिळणार आहे. (Bhushan Prdhan-Shivani surve)

एक अरेन्ज मॅरेज ही अद्भुत लव स्टोरी असू शकते' ह्या वाक्यात 'ऊन सावलीचे' गूढ लपलेले आहे. 'ऊन सावली' ह्या चित्रपट मध्ये प्रणय आणि आन्वीची प्रेमकथा आहे. प्रणयला लग्न करायचं नाही आणि दुसरीकडे अन्वीला लग्न करायचं नाही पण हे ती तिच्या आईला सांगू शकत नाही म्हणून ते दोघेही त्यांच्या पालकांच्या मनाचा विचार करता लग्नाला होकार देतात. आणि एक दिवस असा क्षण येतो जेव्हा आन्वी आणि प्रणय त्यांच्या कुटुंबियांसोबत एकमेकांना भेटतात. प्रणयला पहिल्या नजरेतच आन्वी आवडते. परंतु आन्वीचा विरोध हा कायम आहे.

'व्हॅलेन्टाईन्स डे'ला टायटल सॉंग नकुल देशमुख आणि श्रिया जैन यांनी गायिले आहे.

तिकीट विंडो पिक्चर्स बॅनर अंतर्गत समीर शेख द्वारा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाची कथा अभय वर्धन यांनी लिहिली आहे. तसेच निर्देशन दिवाकर नाईक यांनी केले आहे. चित्रपटा मध्ये म्युजिक सार्थक नकुल यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच नकुल देशमुख आणि श्रिया जैन यांनी हे गाणे गायिले आहे.

अजिंक्य ननवरे, राज सरनागत, अंकिता भोईर, विकास हांडे, श्वेता कामत, प्रिया तुळजापूरकर आणि मनाली निकम ह्याचा देखील समावेश आहे. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT