मनोरंजन

भूषण प्रधान-शिवानी सुर्वेच्या चित्रपटात दडलंय ‘ऊन सावलीचे’ गूढ

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे स्टारर चित्रपट 'ऊन सावली' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. चित्रपटाच्या टीजर आणि गाण्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रेलरला भरभरून प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

ऊन सावली हा चित्रपट प्रणय आणि आन्वीची प्रेमकथा आहे. 'एक अरेन्ज मॅरेज ही अद्भुत लव स्टोरी असू शकते' ह्या वाक्यात 'ऊन सावलीचे' गूढ लपलेले आहे. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहणारे हे सुंदर जोडपं बरच काही सांगू पाहत आहे, बरच काही बोलू इच्छित आहेत. पहिल्या भेटीतच प्रणयला आन्वी आवडते. परंतु आन्वीचा विरोध हा कायम आहे. तिच्या मनात तर वेगळाच गोंधळ चालू आहे. हे आगळे वेगळे प्रेम पाहण्यासाठी प्रेक्षकांना थियेटर मध्ये तर जावेच लागेल. हा चित्रपट लग्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतः शी जोडणारा आहे.

तिकीट विंडो पिक्चर्स बॅनर अंतर्गत समीर ए शेख द्वारा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दिग्दर्शन दिवाकर नाईक यांनी केले आहे. चित्रपटा मध्ये म्युजिक सार्थक नकुल यांनी संगीतबद्ध केले आहे. अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे हे प्रमुख भूमिका साकारत आहेत. तसेच अजिंक्य ननावरे, राज सरनागत, अंकिता भोईर, विकास हांडे, श्वेता कामत, प्रिया तुळजापूरकर आणि मनाली निकम याचा देखील समावेश आहे. हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

SCROLL FOR NEXT