Bhumi Pednekar | भूमी पेडणेकर म्हणते... इमरान खान माझ्यासाठी ग्रीनेस्ट फ्लॅग होता  
मनोरंजन

Bhumi Pednekar | भूमी पेडणेकर म्हणते... इमरान खान माझ्यासाठी ग्रीनेस्ट फ्लॅग होता

पुढारी वृत्तसेवा

रो मँटिक-कॉमेडी चित्रपटांचा काळ गाजवणारा अभिनेता इमरान खान तब्बल एका दशकानंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहे. नेटफ्लिक्सच्या आगामी ‘अधुरे हम अधुरे तुम’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, यात त्याची मुख्य जोडी अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत दिसणार आहे. या प्रोजेक्टबद्दल भूमी प्रचंड उत्सुक असून तिने इमरानबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भूमीने सांगितले की, ती आधीपासूनच इमरानची मोठी चाहती होती. ‘लहानपणापासूनच मला इमरानवर प्रचंड क्रश होता. त्याच्या सर्वच रोमँटिक चित्रपटांमध्ये तो एक परफेक्ट ग्रीनेस्ट फ्लॅग (उत्तम पुरुष) वाटायचा. आता तसे रोमँटिक चित्रपट बनत नाहीत. जेव्हा मी या नव्या चित्रपटाची कथा वाचली, तेव्हा मला ती खूप आवडली. ही एक प्रगल्भ आणि सुंदर कथा आहे,’ असे भूमी म्हणाली. ‘जाने तू... या जाने ना’ चित्रपटातून पदार्पण करणार्‍या इमरानने ‘आय हेट लव्ह स्टोरीज’ आणि ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता भूमी आणि इमरानला एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT