भुलभुलैय्या सिरीजमधील तिसरा सिनेमा भुलभुलैय्या 3 नुकताच रिलीज झाला आहे. यावेळी 2 मंजुलिका असलेल्या या सिनेमाने आतापर्यंत प्रेक्षकांना घाबरवण्यासोबतचा हसवले आहे. दुसऱ्या दिवशीही या सिनेमाने धमाकेदार कलेक्शन जमवले आहे.
या सिनेमाने पहिल्याच दिवशी 35.5 कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे ही घोडदौड दुसऱ्या दिवशीही सुरूच राहीली आहे. त्यामुळे या सिनेमाचे दोन दिवसांचे एकूण कलेक्शन तब्बल 72 कोटी झाले आहे.
या सिनेमाने कार्तिकच्याच प्यार का पंचनामा 2 चा रेकॉर्ड मोडला आहे. पण भुलभुलैय्या 3 ची बरोबरी सिंघम अगेनसोबत केली असता सिंघम अगेन पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
भुलभुलैय्या 2 हा 2022 मध्ये रिलीज झाला होता. यातील कार्तिक आर्यनच्या रूहबाबा या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचे प्रेमही खूप मिळाले होते.