Bhau Kadam Daughter Mrunmayee Kadam: प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन भाऊ कदम यांची कन्या मृणमयी कदम हिचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मृणमयीच्या परदेशी शिकण्यावरून तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर करणाऱ्या पडणाऱ्या कमेंटवर ती बोलताना दिसत आहे. तिने आत्मविश्वासाने नको त्या कमेंट करणाऱ्या पुरूषी अहंकार असलेल्या प्रवृत्तीनां चांगलेच ठेचले. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
मृणमयी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिते की, 'अशा मेल इगो असलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करणं सोपं आहे. मात्र कधी कधी शांत राहणं हे त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासारखं असतं. ते पुन्हा अशी कृती करतात. त्यामुळं मी आज बोलायचा निर्णय घेतला.
मृणमयी पुढे म्हणते, 'अनेक परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थांना नेहमी तुम्ही हे विलासी आयुष्य तुमच्या पालकांच्या पैशावर जगत आहात अशा कमेंटचा सामना करावा लागतो. मात्र त्यांना १२ तासाची शिफ्ट, रात्रीचे जागरण, दबाव, होमसिकनेस, ट्युशनचा तणाव आणि एका वेगळ्या देशात शुन्यातून विश्व निर्माण करण्यासाठी लागणारी शक्ती या सर्वांचा विसर पडतो.
प्रत्येक हास्य म्हणजे आयुष्य सुखकर आहे असं नसतं. आमच्या पैकी काही लोकं काम करतात, अभ्यास करतात, संघर्ष करतात आणि प्रत्येक दिवशी आपलं काम करण्यासाठी पुन्हा हजर असतात. परदेशात शिकणाऱ्या मुलांबद्दल काहीही विचार करण्यापूर्वी त्यांच्या त्यागाची स्टोरी जाणून घ्या. आम्ही एवढ्या पुढं उगाचच आलेलो नाही.