मनोरंजन

Bharatmata Cinema : अखेर ‘भारतमाता’ व्यवस्थापनाला जाग, ३ एप्रिलला झळकणार पहिला मराठी सिनेमा

गुरुवारी सायंकाळी औपचारिक उद्घाटन, ‘सुपर डुपर’चा प्रीमियर शो

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : लालबागमधील मराठीजनांची नाराजी आणि ठाकरेंच्या शिवसेनेने दिलेल्या दणक्यानंतर भारतमाता सिनेमागृहाच्या नव्या व्यवस्थापनाला अखेर जाग आलीय. ‘सुपर डुपर’ हा पहिला मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी (दि. ३) नव्या भारतमातामध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याआधी २ एप्रिलला सायंकाळी या चित्रपटाचा खास प्रीमियर शो तसंच औपचारिक उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आले आहे.

गुरुवारी होणाऱ्या प्रीमियर शोला स्थानिक खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, नगरसेविका भारती पेडणेकर आणि शाखाप्रमुख मिनार नाटळकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, भारतमाता चित्रपटगृहात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी देण्याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे.

मराठी सिनेमाचं माहेरघर अशी ओळख असलेलं भारतमाता चित्रपटगृह गेल्या २४ मार्चला गुपचूप सुरू करण्यात आलं. ते देखील धुरंधर द रिव्हेंज या हिंदी चित्रपटाने. त्यामुळे लालबागच्या मराठी रसिक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. भारतमातामध्ये मराठी सिनेमे प्रदर्शित करावेत, अशी मागणी करत ठाकरेंच्या शिवसेनेने भारतमाता व्यवस्थापनाविरोधात दंड थोपटले होते. आता मराठी तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची ग्वाही व्यवस्थापनाने दिलीय, अशी माहिती शाखाप्रमुख मिनार नाटाळकर यांनी दिली.

जिथे पहिला सिनेमा पाहिला तिथंच प्रीमियर शो ज्या चित्रपटगृहात आयुष्यातल्या पहिला सिनेमा पाहिला, त्याच भारतमातामध्ये माझा सुपर डुपर हा नवा चित्रपट प्रदर्शित होतोय, यासारखा दुसरा आनंद नाही, अशी भावना निर्माते विजय शिंदे यांनी व्यक्त केली. विजय शिंदे हे लहानपणी लालबागमध्येच राहत होते. त्यांचे शालेय शिक्षणही नरे पार्क मैदानाजवळच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालंय.
विजय शिंदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT