Bhagyashree nh 
मनोरंजन

Bhagyashree nh : ‘आता माझ्या आईचा कधीच फोन येणार नाही!’ ; कुंकू टिकली आणि टॅटू फेम भाग्यश्री न्हाळवेला मातृशोक

इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती : भावनिक शब्दांमध्ये वाहिली श्रंद्धांजली

Namdev Gharal

Bhagyashree nh मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा व ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ या मालिकेत मध्ये मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवेच्या आईचे निधन झाले आहे. भाग्यश्रीने डॉ. उदय कुंदप यांच्याशी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. तिचे पती पेशाने डॉक्टर आहेत. लग्नाला केवळ दोन महिने झाले नाहीत तोवर तिच्या आईचे निधन झाले आहे. गेल्या दोन महिन्यात तिचे व तिच्या आईचे एकदाही बोलणे झालेले नाही यावरुन तीने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. तिची आई गेली वर्षभर आजारी होती.

भाग्यश्री व डॉ. उदय यांचा विवाहसोहळा २ डिसेंबर २०२५ रोजी पार पडला. त्‍यावेळी तिने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना 'भाग्योदय' असे कॅप्शन दिले होते. आता याच लग्नातला आईचे आर्शीवाद घेत असतानाचा फोटो शेअर करत आपल्या व आईच्या नात्‍याबद्दल सांगितले आहे. तसेच तिच्याशी बोलणेसुद्धा न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

काय म्हटले आहे भाग्यश्रीने आपल्या पोस्टमध्ये

आई......! आज माझ्या लग्नाला फक्त दोन महिने पूर्ण होत आहेत, पण दोन महिन्यात आई ने मला एकही फोन केला नाही. का तर "सासरी गेलेल्या मुलीला आई ने सारखा फोन करू नये. तिचं संसारात लक्ष लागत नाही." अश्या मताची माझी आई मला एकही फोन न करता देवाघरी गेली. आणि आता माझ्या आईचा कधीच फोन येणार नाही...लग्नाला माझ्या दोन महिने पण झाले नाहीत पण तू मला सोडून गेलीस...हे मला मान्य होत नाहीये.. मला शेवट पर्यंत तुझ्या पाशी रहायच होत म्हणून मला लग्न न्हवत करायचं...पण तू....! , अशा शब्दात तीने आपले दुख व्यक्त केले आहे.

पुढे भाग्यश्रीने म्हटले आहे की माझा संसार पहायला तू मला आयुष्यभर हवी होतीस. माझ्या नारायणाला आता कोण नमस्कार करेल सांग तसेच केवळ आईच्या इच्छेखातर मी लग्न केले आणि ती आता सोडून देवाघरी गेली तसेच तीने आपल्यासाठी किती चांगला मुलगा निवडला आहे अशी भावनाही व्यक्त केली आहे.

भाग्यश्री न्हाळवे सोशल मीडियावर ती अनेकदा 'Bhagyashree NH' या नावाने प्रसिद्ध असल्याने प्रेक्षक तिला याच नावाने ओळखतात. कुंकू टिकली आणि टॅटू या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. तसेच अजय देवगण यांच्या तान्हाजी या चित्रपटात तीला छोटी पण महत्‍वाची भूमिका मिळाली होती. ती मुळची पूणे सासवड येथील आहे अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना तीने मालिका विश्वात चांगली ओळख तयार केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT