प्रसिद्ध मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिची स्वप्नपूर्ती झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो टाकत मुंबईत घर घेतल्याची खूषखबरी चाहत्यांना दिली आहे. स्वप्नपूर्ती असे लिहीत तिने घराच्या पुजेचे फोटो शेअर केले आहेत.
भाग्यश्री मोटे हिने म्हटले आहेकी सुमारे १४ वर्षांपूर्वी मी मुंबईत येणा जाणं सुरू केला त्यावेळी राहायला जागा नसल्या कारणाने एका दिवसात येऊन, ऑडिशन्स देऊन, भेटीगाठी करून पुण्याला परत जावा लागायचे.?
यावेळी तिने स्वप्ननगरीत हक्काचे घर घेतल्याचे सांगितले आहे.
भाग्यश्री ही मराठी आणि हिंदी दोन्ही क्षेत्रात कार्यरत आहे
त्यांनी सुरुवातीला नाटक आणि दूरदर्शन मालिकांमधून अभिनयाची सुरुवात केली आणि नंतर मराठी चित्रपटसृष्टीकडे वळल्या. देवयानी (Star Pravah) – या मालिकेमधील त्यांच्या भूमिकेमुळे त्या घराघरात प्रसिद्ध झाल्या.
भाग्यश्रीने एकदम कडक, शोधू कुठे, पाटील, चौकट इत्यादी मराठी सिनेमातही अनेक महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.
भाग्यश्री या त्यांच्या सुंदर चेहऱ्यामुळे आणि दमदार संवादफेकीमुळे ओळखल्या जातात.
त्या भावनिक, पारंपरिक तसेच ग्लॅमरस अशा सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये सहज रुळतात.
खूप कृतज्ञ आहे, सगळ्यांनी इतकं प्रेम दिला, साथ दिली. खूप खूप धन्यवाद आणि आभार. माझ्यावरचा प्रेम आणि समर्थन असंच राहू द्या असे म्हणून तिने धन्यवाद दिले आहेत.