मुंबई : पुढारी ऑनलाईन
प्रसिद्ध मालिका 'भाभी जी घर पर हैं' फेम अंगूरी भाभी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी अत्रेला कोरोनाची लागण झाली आहे. एका वेबसाईटच्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर शुभांगी आयसोलेट झाली आहे. सर्व नियमांचे ती पालन करत आहे.
शुभांगी अत्रेला सुरुवातीला सौम्य लक्षणं होती. तिने कोरोना टेस्ट केल्यानंतर तिचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ती घरीचं क्वारंटाईन झाली आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये सिने कलाकार आणि छोट्या पडद्यावरील कलाकारांचा समावेश आहे.
वाचा – अक्षय कुमार हॉस्पिटलमध्ये दाखल
टीव्ही अभिनेत्री रूपा गांगुली, मोनालिसा, सुधांशू पांडे, आशीष महरोत्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर बॉलिवूडमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेता अक्षय कुमार, विक्की कौशल, भूमी पेडनेकर, गोविंदा हे कोरोना पॉझिटव्ह आहेत.
वाचा – गोविंदा, विक्की कौशल आणि भूमीलाही कोरोनाची लागण
मनोज बाजपेयी, आर माधवन, रणबीर कपूर, रणबीर कपूर, आमिर खान, संजय लीला भन्साळी, कार्तिक आर्यन, सिद्धांत चतुर्वेदी, मिलिंद सोमन, सतीश कौशिक यांना कोरोनाची लागण झाली होती.